एकाद्या अनुभवी माणसाने केलेली आज्ञा व साधकाने त्या आज्ञेवर विश्वास ठेवून केलेली कारवाई कशी फलदृप होते हे या चिंतनाचे स्वरुप आहे.
यासाठी महाभारतातील एक गोष्ट समोर येते. कौरव पांडवांचे होणार्या युद्धाची तयारी सुरु असते. युद्धासाठी कुरुक्षेत्र सिद्ध करण्याचे काम सुरु असते. हत्तीच्या सह्याने विशालकाय वृक्षाला तोडण्याचे काम चालू असते.
वृक्षावर एक चिमणी आपल्या चार पिलासह रहात होते. तिचं घरटं उडताही न येणार्या इवल्या पिलासह कोसळलं. पण आश्चर्य म्हणजे ती पिलं सुरक्षित होते.
त्या घाबरलेल्या चिमणीनं हताश होवून अर्जुना सहीत तेथे आलेल्या श्रीकृष्णाकडे पाहिले. श्रीकृष्ण युद्धभूमीचे निरीक्षण व विजयासाठी आवश्यक ती व्यहरचना करणेसाठी तेथे आले होते. दुबळ्या पंखात सगळी शक्ती एकवटून त्या चिमणीने श्रीकृष्णाच्या रथाकडे उडान केले.
हे कृष्णा, माझ्या बाळांना वाचवं या भयंकर युद्धांत ती चिरडली जातील असे तिने विनविले श्रीकृष्णाने आपली असाह्यता तिला सांगितली. तेव्हा दृढ विश्वासाने चिमणी म्हणाली, तुम्ही माझे तारणहार आहात, माझ्या बाळाचं नशीब आता तुमच्या हातात आहे. त्यांना वाचचायचं कां मरु द्यायचं हे आता तुम्हीच ठरवा.
हा विश्वास चिमणीने कृष्णावर दाखविला. आपली शरणागती दर्शविली.
हे पाहून श्रीकृष्णाने तिला आज्ञा (दिली) केली 3 आठवडे पुरेल एवढं अन्न तू घरट्यात गोळा कर.
हे संभाषण अर्जुनाला माहित नसते. तो त्या चिमणीला बाणाने हुसकविणार असतो एवढ्यात त्याच्या नजरेला श्रीकृष्ण त्या चिमणीकडे पाहून स्मीत हास्य करीत असल्याचे दिसते.
चिमणी आनंदाने पंख फडकावते आणि घरट्याकडे जाते.
दोन दिवसानंतर शंख नाद होवून युद्धाची सुखात होण्यापूर्वी श्रीकृष्ण अर्जुनाकडे धनुष्य आणि बाण मागतात.
अर्जुन आश्चर्य चकीत होतो. या युद्धात शस्त्र हातात न घेण्याची प्रतिज्ञा करणार्या श्रीकृष्णाने केलेली ही मागणी अर्जुनाला धक्कादायक वाटली.
आपण सर्वोत्कृष्ठ धनुर्धारी असताना असे कां केले हे अर्जुनाला कळले नाही.
अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वत:कडे घेत श्रीकृष्णाने हत्तीवर नेम धरला. पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्या भोवती असलेल्या घंटेला लागला, आणि कांही ठिणग्या चमकल्या.
अर्जुनाला आश्चर्य वाटले. एवढा साधा नेम चुकल्याचे तेव्हा अर्जुनाने मी हत्तीवर नेम धरु कां असे श्रीकृष्णास विचारले.
तेव्हा त्याची गरज नाही असे म्हणत श्रीकृष्णाने धनुष्य बाण अर्जुनाकडे परत केले.
तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाने केशव हत्तीवर वार कां केला असे विचारले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, त्या हत्तीने चिमणीचं नांदतं घरटं असणारं झाड पाडलं होते.
कोण कुठली चिमणी ती अर्जुनाला कळेना आणि एवढं होवून ही तो हत्ती जिवंत आहे. त्याच्या गळ्यातील घंटा तेवढी उडून पडली आहे.
अर्जुनाच्या विचलीत मनाकडे दुर्लक्ष करीत श्रीकृष्णाने अर्जुनास शंख नाद करुन युद्ध सुरु झाले. आठ दिवसांत दोन्ही कडील असंख्य प्रेतांचा ढीग पसरला होता.
एका विशिष्ठ ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातील घंटेकडे विचार मग्न होवून पहात राहिले. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले केली माझे साठी ही घंटा उचलून बाजूला ठेवशील कां ? एवढ्या महायुद्धात एवढी प्रचंड कामगिरी करण्याची असताना एक क्षुल्लक धातुचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण आपणास कां सांगत आहे हे अर्जुनाला कळेना.
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हीच ती घंटा मी बाण मारल्याने हत्तीच्या गळ्यातून निसटली. अर्जुनाने ती अजस्त्र घंटा उचलली व त्यानंतर एक, दोन, तीन, चार आणि पांच चिमण्या पाठोपाठ एक प्रौढ चिमणीने पंख पसरुन झेप घेतली व श्रीकृष्णास प्रदक्षिणा घातली.
निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचविले. तेव्हा अर्जुन म्हणाला माफ कर मानवी आवतारातल्या तुला मर्त्य मानवासारखं वागताना पाहून मी खरं तुझं स्वरुप विसरलो होतो.
तेव्हा घरा उचलली जाई पर्यंत घरातच थांबा ही कृष्णाची आज्ञा व सर्वत्र श्रीकृष्ण आपला तारणहार आहे हा चिमणीला विश्वास येथे खूप कांही शिकवून जातो.
करोनाच्या काळात धोका टळत नाही तो पर्यंत घरात बसा व जीव वाचवा हा संदेश (आज्ञा) विश्वास ठेवून पाळा.