1. रस्ता – मार्ग
दोघांचा अर्थ समान – बोध मात्र भिन्न
रस्ता : जो कसाही जाऊ शकतो
मार्ग : मात्र ध्येयाकडे नेतो. हा बोध
2. खरं – सत्य
खरं : बोलावं हा उपदेश आहे.
सत्य : सत्याला सोबत पुरावा असावा लागतो.
3. घसरडं – निसरडं
पडून झालं की घसरडं
सावरता येते ते निसरडं
4. अंधार – काळोख
विद्युत प्रवाह खंडीत झाला की होतो तो अंधार
निसर्गात जाणवतो तो काळोख.
5. पडणं – धडपडणं
पडणं हे अनिवार्य असतं.
धडपडणं हे कदाचित सावरणं.
6. पाहणं – बघणं
आपण स्वत:हुन जे पाहतो ते पाहणं होय
दुसर्यानं सांगितल्यावर जे पहातो ते बघणं होय
7. पळणं – धावणं
पळणं : पाकीटमार काम झाल्यावर करतो ते पळण
ट्रेन पकडताना आपण जे करतो ते धावणं.
8. झाड – वृक्ष
माणसाकडून जे लावले जाते ते झाड
आधीपासूनच असतो तो वृक्ष
9. खेळणं – बागडणं
जे नियमाने बांधले असते ते खेळणं
जे मुक्त असतं ते बागडणं
10. ढग – मेघ
ढग : जे वार्याने ढकलले जातात ते ढग
मेघ : जे नक्की बरसतात ते मेघ
11. रिकामा – मोकळा
वेळ : जो दुसर्याकडे असतो त्याला रिकामा वेळ
मोकळा : जो वेळ आपल्याकडे असतो त्याला मोकळा वेळ
12. निवांत – शांत
कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा
काहीच न करतां बसून मिळतो तो शांतपणा
13. आवाज – नाद
आपल्या चालण्याने जो होतो तो आवाज
जो मोराच्या चालण्याने होतो तो नाद
14. झोका – हिंदोळा
बागेत आपला नंबर कधी लागेल याची वाट पहाणारा झोका असतो
तर मुक्तपणे झाडामधुन खेळता येतो त्याला हिंदोळा म्हणतात.
15. स्मीत – हसणं
मनांत एखादी गोड आठवणं आली की जे दिसतं ते स्मीत होय
हसणं : हे लोकांसमोर दाखवावं लागतं
16. अतिथी – पाहुणा
जो यावा यावा वाटतो तो अतिथी
पाहुणा : जो आला की कधी जाईल असं मनांत येतं तो पाहुणा
17. घोटाळा – भानगड
अचानक – नकळतं जो होतो तो घोटाळा
जी गोष्ट नियोजन बद्ध पद्धतीने होते ती भानगड
18. प्रपंच – परमार्थ
शरीराने करायचा तो प्रपंच. पाचांनी मिळून करायचा तो प्रपंच.
मनाने करायचा तो परमार्थ होय. एकट्याने करावयाचा तो परमार्थ होय.