गुरुभक्ती व गुरुकृतज्ञता व्यक्त करणारी काव्य पंक्ती-
श्री ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराजांना या काव्य पंक्तीतून कृतज्ञता दर्शविली आहे.
सातार्यातील एक गांव, गोंदावले तयाचे नांव।
त्याचे ठायी भक्तीचा भाव, श्री महाराज तुमचे मुळे।
वातावरण मस्त, काय ती शिस्त।
तुमच्यावर भिस्त, श्री महाराज तुमचे मुळे।
काय ती स्वच्छता, काय ती सुंदरता ।
काय ती नम्रता, श्री महाराज तुमचे मुळे ।
हजारो भक्त येती, मनोभावे दर्शन घेती ।
प्रसाद सेवन करुनी तृप्त होती, श्री महाराज तुमचे मुळे ।
दुरावते अंतरीचे दु:ख, मिळते परमार्थाचे सुख ।
येते जनसागरास भरती, श्री महाराज तुमचे मुळे ।
तुम्हीच माझे मन, तुम्हीच माझे तन ।
रोम रोमांत अनुभूतीचे क्षण, श्री महाराज तुमचे मुळे ॥
जय जय रघुवीर समर्थ, कृतार्थ मी झालो, देखिले तुमचे चरण..
महाराजांना कोटी कोटी वंदन…