कांही न मागे कोणासी, तोचि आवडे देवासी

या दोन ओळीत संत आपला उपदेश साधकाला सांगत आहेत.

माणसाने प्रपंचात कसे असावे व परमेश्‍वराला काय आवडते याचे परीपुर्ण मार्गदर्शन या ओळीत केले आहे.

ते म्हणतात, प्रपंच करीत असताना गरजा ह्या प्रत्येकाला सतावत असतात. म्हणून दीनवाणे कुणासमोर मदतीसाठी हात पसरु नका. जे हवे आहे त्याचा नीट विचार करा, त्यावर चिंतन करा व ते श्रद्धेने व प्रेमाने साध्य करा.

तेथे लाचारी पत्करु नका. यासाठी मन मात्र शुद्ध व आनंदी , प्रसन्न ठेवा म्हणजे असाध्य गोष्टीपण साध्य होतील.

खडीसाखरेचा खडा ठेवला की तिथे येण्यासाठी मुग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. त्या आपोआप तेथे येतात. तेव्हा तुमची तळमळ, गोडी, निस्पृहता तुम्हाला तुमच्या इष्ट गोष्टीपर्यंत घेऊन जाईल. त्यासाठी वेगळी खटपट करण्याची गरज नसते.

याचाच अर्थ कुणाकडे कांही मागायचे नाही, हे परमेश्‍वराचे आवडते स्वरुप आहे.

तेव्हा ते स्वरुप पहाण्यासाठी ही वृत्ती तुम्ही ठेवा.
या गोष्टी परमेश्‍वराला आवडतात…
1. लाचारी नको,

2. निरपेक्षवृत्ती

3. स्वावलंबन

4. गुणानुराग

5. कुणाशी वैर न ठेवणे

6. संपत्ती, आसक्ती, ऐश्‍वर्य या बद्दल उदासिनता,

7. थोडी चिकाटी

8. श्रद्धा

9. सावधानवृत्ती

10. परमार्थ गोडी

11. सत्यवचन राखणे

12. कष्टानंतरच् मोल स्विकारणे

13. दुष्ट अज्ञानी माणसांची संगत न ठेवणे

14. योग्य वेळेची वाट पहाणे म्हणजे धीर राखणे

15. कुणावर भार टाकण्यापेक्षा परमेश्‍वरावर विश्‍वासाने भार टाकणारा ईश्‍वराला आवडतो,

16. सुखा समाधानात रहाणारा, चिंता न करणारा परमेश्‍वराला आवडतो

17. स्वार्थासाठी न जगता परोपकार करणारा ईश्‍वरास आवडतो

18. ऋण काढून सण करणारा परमेश्‍वरास आवडत नाही. ऐपत पाहून प्रपंच करणारा आवडतो

19. कमळासारखे जीवन जगणारा, कितीही संकटे आली, अडचणी उभ्या राहिल्या तरी ताठपणे न डगमगता मनांवर कांही परिणाम न देता उभा रहाणारा ईश्‍वराला आवडतो

20. सर्व ठिकाणी समता भाव ठेवणारा परमेश्‍वराला प्रसन्न करुन घेईल व तोच साधक परमेश्‍वराला आवडता होईल.

या विवेचनावरुन परमेश्‍वराला काय आवडते व काय आवडत नाही याचे स्मरण झाले.

तेव्हा काही न मागे कोणाला, तोचि आवडे देवाला ही उक्ती खरी वाटते.

त्याप्रमाणे आपण प्रपंचात रहावे, असे साधू संत सांगतात.

1 Comment

  • KSPAWAR
    Posted February 14, 2023 7:47 am 0Likes

    Nice vichar

Leave a comment