प्राण्यांचे प्रकार दोन असतात
बोलणारा प्राणी – आपली भावना गरज सांगणारा प्राणी
मूक प्राणी – सर्व कळून पण न सांगणारा व्यक्त न करू शकणारा अबोल प्राणी.
चराचरांमध्ये असणार्या अशा सर्व प्राण्यांवर एकात्म भावाने पहाणारा जो गुण त्याला जीवदया म्हणतात.
जीवदयेमध्ये पण दोन प्रकार आहेत.
ज्या जीवांना – एकेंद्रिय, बेइंद्रिय, त्रिईंद्रीय, चौरेद्रिय, पंचेद्रीय अशांना त्रास होवू नये असे वागणे याला जीवदया म्हणतात.
त्यांची घरे वेगवेगळी असली तरी त्या घरांमध्ये वास करणारा सर्व ठिकाणी असणारा आत्मा हा समान आहे.
ज्यांना बोलता येते, विचार करता येतो व जे प्रयत्न करु शकतात त्यांना कांही अडचण येत नाही.
पण मूक प्राणी आहेत त्यांना आपली भावना व्यक्त करता येत नाही.
त्याचेवर अत्याचार होतात. त्यांची पिळवणूक होते. कसाईकडे पाठवण होते व हत्या होते. या निर्घृण हत्तेतून त्यांची मुक्तता करणे त्यांना अभय देणे. त्यांचा चरीतार्थ व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी मदत करणे याला जीवदया म्हणतात.
थोडक्यात मानवता वाद म्हणतात.
यासाठी जैन धमामध्ये आनंदाचे प्रसंगी, पूजा पाठ वगैरे करताना मंगल प्रसंगी या कामाला मदत करण्याच्या हेतूने विशिष्ट निधीचे संकलन केले जाते.
त्यातून उभा रहाणारा निधी जवळपास असणार्या गोशाळांना पाठविला जातो व तेथे मूक प्राण्यांची देखभाल सांभाळ केला जातो.
मूक प्राण्यांना स्वार्थासाठी विकून कसायाच्या तावडीत देवून जी हत्या चालू असते ती रोखणे, त्या प्राण्यांची कसाईच्या तावडीतून सुटका करणे हा उपक्रम जैन धर्मियांच्यात नेहमीच चालु असतो.
याच बरोर कोणताही मूक प्राणी कोंडून ठेऊ नका. त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम आविरतपणे करण्यासाठी जो निधी जमवला जातो त्याला जीवदया निधी म्हणतात.
जैन धमामध्ये यासाठी मंदीरामध्ये जीवदया निधी ची स्वतंत्र दानपेटी ठेवलेली असते. तिर्थकराची शिकवण म्हणून तेथे दान करण्याचा संदेश लिहीला असतो.
असे हे जीवदयेचे स्वरुप आहे.
आता अनुकंपा दान हा काय प्रकार आहे हे पाहू – अनुकंपा म्हणजे साधर्मिका बद्दल आपणाला दया येणे. त्याच्या अडीअडचणी लक्षांत घेवून त्याला निरपेक्ष भावाने मदत करणे.
उदा – साथीचे रोग, दुष्काळ, अपत्ती अशा अडचणीतून साधर्मिकाला बाहेर काढणे याला अनुकंपा दान म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा यांनी उभे केलेले टाटा कॅन्सर हॉस्पिटल.
तेव्हा जीवदया व अनुकंपा हे दोन्ही ही दानाचेच प्रकार आहेत.
जीवदया ही मूक प्राण्यांसाठी तर अनुकंपा ही घोर खाईत सापडलेल्या, नडलेल्या आपत्ती ग्रस्त मानवासाठी मदत समजली जाते.
याप्रमाणे दोन्हीमधील फरक जाणून विवेकबुद्धीने जीवदया करायची का अनुकंपा दान करायचे हे मानत नक्की करावयाचे आहे.
दोन्ही केल्यास अति उत्तम. दोन्ही दाने श्रेष्ठ आहेत.
विवेक महत्वाचा आहे.