भेदा-भेद वाद

अनेक वर्षांपासून चालत आलेला हा वाद आहे.

सृष्टीमध्ये तसेच मानवामध्ये इतके भिन्न भिन्न प्रकार – माणसे दिसतात याला सीमा नाही.

या तत्वाला धरुन जैन धमामध्ये अनेकांत वाद पुढे आला, हिंदु धर्मामध्ये भेदा भेद दाखविले गेले.

हिंदु-मुस्लीम भाई भाई म्हणाले. हे सर्व म्हणाले, सांगितले पण आचरणात आपले नाही. तेथे वाद सुरु झाला.

मी उच्च कुळातील तो नीच कुळाचा, मी राजा तू प्रजा अशा भावनेने लोक वागू लागले तेथे अनेक अनेक असा द्वैत भाव उत्पन्न झाला.

साधु महंत आले त्यांनी विवेकाने हा द्वैतभाव मोडून काढण्याचा प्रयत्न केला. एकांत वाद स्थिर करण्याचा प्रयत्न केला. सर्व प्राणीमात्रांत व सृष्टीत असणार्‍या सर्वामध्ये आत्मा हा एकच आहे तो सर्वत्र आहे, तो कुठे नाही असे जाणवत नाही.

आपण मात्र स्वार्थापोटी त्यामध्ये भेद करतो. एकाचे अनेक तुकडे करतो. नारळ फोडला तरी खोबर्‍याची गोडी कमी होत नाही.

सुवर्ण अलंकार करण्यासाठी सोन्याच्या तारेचे विभजन केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.

तसे मानवात सोईसाठी अनेक अनेक विभजन झाली तरी मानवता धर्म तुटत नाही. अभेद्य रहातो याला एकांत वाद म्हणतात.

परमेश्वर सर्व ठिकाणी आहे हा एकांतवाद झाला. स्वार्थासाठी आपण त्याला अनेक रुपात ठेवले व त्याप्रमाणे त्याची पूजा केली. हा अनेकांत वाद झाला.

तरीपण शेवटी सवामध्ये भरलेला असा तो हरी एकच आहे व तो माणसा माणसामध्ये ओढ ही भावना होणे याला एकांत वाद म्हणायचे.

जीवन जगत असताना अनेक व्यक्तींशी आपला संबंध येतो त्यातून स्वार्थ उत्पन्न होतो. पण त्याची सीमा ठरलेली आहे. ती ओळखून मानवता भाव जागृत करुन आपण त्या सीमेमध्ये व्यवहार केले तर भेदा-भेद विसरुन आपण आनंदी समाधानी राहू शकू.

अनेकांत वाद, भेदाभेद वाद, जातीभेद, उच्चनीच भेद, सर्व विसरले पाहिजेत व मानवता हा एकांत भाव स्वीकारायचा प्रयत्न करावा.

1 Comment

  • सो. शिला केतकर
    Posted July 18, 2022 10:39 pm 0Likes

    भेदाभेद फार छान लिखाण खरंतर या भेदाभेदामुळेच हिंदू धर्म थोडा मागे गेला
    श्रीमंत गरीब उच्चनीचच्या आणि आजचे जातीभेद
    आजच्या युगात कारखानदारीमुळे निर्माण झालेले कामगार आणि उद्योगपती हे भेद
    तसेच पुढारी आणि खालचे कार्यकर्ते यांच्यातील भेद

    मुळे सर्व समाज विस्कटला आहे
    काही वेळा मार्क्सचा साम्यवाद बरा वाटतो

    संतांनी भेट मानला नाही ही गोष्ट तर सत्यच आहे
    आपण चिंतनासाठी निवडलेला भेदभेद हा विषय फार छान आहे
    राम कृष्ण हरी🙏

Leave a comment