शहनाई

शहनादी ई हे एक मंगल वाद्य आहे. पुरातल काळात या शहनाईला पुंगी-सनई म्हणत. पुढे पुढे या पुंगीतून म्हणावे असे सूर बाहेर पडेनासे झाले. पुंगी वाजेनाशी झाली. तेव्हा राजे राजवाडे यांनी आपल्या दरबारात पुंगीच्या जागी शहनाई हे वाद्य आपले तेंव्हापासून राजाश्रय मिळाल्यामुळे मोठ मोठ्या कार्यक्रमात स्वागतात – बक्षीस समारंभात – शहनाईची चर्चा होवू लागली. कोणत्याही मंगल प्रसंगात भव्यता शहनाई वादनातून दिसू लागली अशी ही शहनाई उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे हाती पडली. त्यांनी त्या शहनाईचे भाग्य उजाडले. तासंन तास लोकांना गुंग करुन सोडणारे भाव शहनाईतून उतरु लागले. अगदी गरीबाचे घरापासून राजे रजवाडे यांचे महालापर्यंत विविध रुपाने शहनाईला स्थान मिळाले. भारतीय वादन क्षेत्रात तिचे मोठे स्थान आहे. जीवनाला चांगला सूर लावण्यासाठी सनईची (शहनाई) गरज आहे. असे मला वाटते. ज्यांनी एकदा शहनाईचे सूर ऐकले ते सूर कायम त्यांचे कानांत गुंजत राहतात हा शहनाईचा महिमा आहे.

Leave a comment