जगद्गुरु ऋषभदेव उपकारी

तिर्थाची निर्मिती करणारे जैन धर्मामध्ये 24 तिर्थंकर सांगितले आहेत. त्यामध्ये ऋषभदेव (आदिनाथ भगवान) हे प्रथम तिर्थंकर मानले जातात.

त्यांनी जैन धर्माची स्थापना केली. जैन आचार, विचार, संस्कार, गणधर, साधुसाध्वी, साधक यांचेवर जैन धर्माचे संस्कार केले. अशा या महान तिर्थंकर ऋषभदेव यांना मी कोटी कोटी वंदन करतो.

ऋषभदेव यांचे पिता नामिराजा व माता मरुदेवी होत. यांचे लांछन ऋषभ बैल म्हणून त्यांना ऋषभदेव म्हणून संबोधले जाते. त्यांचा वर्ण सुवर्ण-कांचन वर्णाचा आहे. असे हे ऋषभदेव परम उपकारी आहेत.

ज्यांची देव, इंद्र आणि मनुष्य यांनी आरती केली आहे. अशा ऋषभदेवांना मी वंदन करतो.

साधकाला चार गतीतून मुक्ती करुन मोक्षपद प्राप्त करुन देणार्‍या प्रथम तीर्थंकर ऋषभदेवांना मी वंदन करतो.

जगरक्षक ऋषभदेवांना मी वंदन सध्याच्या करोना महामारीतून आमचे संरक्षण करण्याची आम्ही प्रार्थना करीत आहोत.

मनातील इच्छा पूर्ण करणार्‍या व इष्ट मोक्षपद प्राप्त करुन देणार्‍या जगद्गुरु ऋषभदेवांना मी वंदन करतो.

त्यांचे गुणगौरव करताना म्हटले आहे, ‘करुणा सागर, करुणा नागर, काया कांचनवान वाणी, मधूर पाण्याच्या झर्‍यासारखी ओघवती अशा या जगाच्या तारणहार ऋषभदेव म्हणतात हे सत्य आहे.

अशा या प्रथम तिर्थंकर ऋषभदेवाना एकच प्रार्थना, त्यांनी या संसाराचे भय दूर करावे व आपली किर्ती जगभरात करावी. आमची सर्वांची करोना पासून रक्षण करावे.

अशा या प्रथम तिर्थंकरानी आदिनाथ प्रभुने, क्षेत्रुंजय तिर्था पालीताणा या ठिकाणी मोक्ष साध्य केला.

वर्षदान करताना त्यांनी सर्वेसर्वा दान करुन टाकले.

अशा या निर्मोही, शत्रुंजय, ऋषभ देवांना शतकोटी वंदना…
ऋषभदेव उपाकरी… जगद्गुरु ऋषभदेव उपकारी…

Leave a comment