अर्जंट पाहिजेत.
🤲इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा🤲
एक शिंपी पाहिजे,
जो एकमेकांची तुटलेली नाती शिवु शकेल
एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,
👉🏻 जो एकमेकांशी न
बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा
एकदा कनेक्शन जोडून देईल,✌🏻
एक ऑप्टिशियन पाहिजे,
👉🏻 जो लोकांची दृष्टी आणि
दृष्टीकोन नीट करून देईल,👍🏻
एक कलाकार पाहिजे,
👉🏻 जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित
हास्याच्या रेषा रेखाटू शकेल,😊
एक बांधकाम कामगार पाहिजे,
👉🏻 जो दोन शेजाऱ्यांमध्ये
उत्तम सेतू उभारू शकेल,
एक माळी काका पाहजे,
👉🏻 जो चांगल्या विचारांच
रोपण करू शकेल,☝🏻
एक प्लंम्बर पाहिजे,
👉🏻 जो तुंबलेल्या मनांना
मोकळं करू शकेल,🤗
एक शास्त्रज्ञ पाहिजे,
👉🏻 जो एकमेकांबद्दलची
ओढ शोधू शकेल,😌
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,
एक शिक्षक पाहिजे,
👉🏻 जो एकमेकांशी संवाद कसा
साधायचा ते शिकवू शकेल,☝🏻
आज तुम्हा-आम्हा, सर्वांना
याचीच नितांत गरज आहे..!!✍️
संपर्क :- माणसाने माणसाशी