वंदना

वंदना हे एका स्त्रीचे नांव आहे. त्यामध्ये नम्रता आहे. हा एक भक्तीचा प्रकार आहे. तेथे साधक नम्रतेने परमेश्‍वराची भक्ती करतो. हा एक अट्टहास आहे. जो एखादी गोष्ट साध्य करुन घेण्यासाठी साध्य वस्तुभोवती घातलेल्या फेर्‍याचा प्रकार असतो.
मंदीरात गेल्यानंतर परमेश्‍वराचे दर्शन घेऊन आपण परमेश्‍वराचे भोवती तीन प्रदक्षिणा घालतो. ही पण वंदना भक् ती होय. प्रपंचात बालकाला वडीलांकडून कांही हवे असेल, तर तो वडीलाभोवती फेर्‍या घालतो, गोंडा घोळतो ही पण वंदना भक्तीच होय.
लहानांनी मोठ्याभोवती हवी ती वस्तु मिळण्यासाठी केलेली याचना याला वंदना भक्ती म्हणतात. प्रथम या भक्तीसाठी साधकामध्ये नम्रता हा गुण येणे गरजेचे आहे. त्याने आपले साध्य काय आहे याचे चिंतन करुन मंदीरात गेल्यानंतर परमेश्‍वरासमोर मांडले पाहिजे व नंतर परमेेेेेेेेश्‍वरा भोवती फेर्‍या घातल्या पाहिजेत. ही वंदना भक्तीची कल्पना आहे.
कांहीजण आपली इच्छा ह्रदयात स्थिर करुन माझा परमेश्‍वर माझ्यातच आहे, असे मानूण स्वत: भोवतीच फेर्‍या मारतात. ही पण वंदना भक्तीच आहे.
दर्शन घेताना परमेश्‍वराचे जे अनेक गुण आहेत, त्याचे आपणास दर्शन होते व त्या चांगल्या गुणांपैकी काही गुण आपणाकडे यावेत ही भावना ठेवून जेव्हा साधक परमेश्‍वराभोवती फेर्‍या घालतो तेव्हा ती वंदना भक्ती होते. त्या भक्तीने परमेश्‍वर प्रसन्न होवून साधकाचे मदतीस धावतो. निसर्गामध्ये सुद्धा पृथ्वी सूर्याभोवती वंदना भक्ती करीत असते.
थोरामोठ्यांचा आशीर्वाद लाभावा, त्यांच्यातील चैतन्याचा थोडा प्रभाव आपणावर पडावा हा या भक्तीचा उद्देश असतो. याच भावनेने दरवर्षी वारकरी पंढरपूरची वारी करीत असतात. ती वारी निरंतर चालू रहावी अशी प्रार्थना करीत असतात. ती वारी निरंतर चालू रहावी अशी प्रार्थना करीत असतात. आपण ही आपल्या आयुष्यात शांती मिळावी म्हणून परमेश्‍वराची वंदना करावी.

Leave a comment