व्यवहार याचा अर्थ वागणूक.
आपण रोजच्य व्यवसायात जसे वागतो, बोलतो, आचरण करतो, कुलधर्म पाळतो, संस्कृतीचे स्मरण ठेवतो याला व्यवहार म्हणतात.
असे संस्कारक्षम व्यवहार करणार्या माणसाला एक पै पण खर्च न करता सर्वांचे मनावर राज्य सत्तेचा पगडा पाडता येतो.
चांगली माणसे शत्रुशीपण चांगला व्यवहार करतात. पण कांही थोडी माणसे मित्रांशी दगा फटका करतात.
येथे आपण विवेक जागृत ठेवून करीत असलेल्या व्यवहाराचे अवलोकन केले पाहिजे.
स्वत:च्या व्यवहाराला आरशात पाहून सुधारले पाहिजे माणसाची भाषा व व्यवहार यावर त्याची उच्च-निचता ठरविली जाते. तुम्ही आपली भाषा व वर्तणूक अशी बनवा की रस्त्याने जाणारा अंधळा पण तुम्हाला राजा म्हणून नमस्कार करील.
जन्मजात काळा-गोरा पण येणे हे निसर्गाचे काम आहे. पण जीवनाला खरा रंग देणे आपल्या स्वत:चे काम आहे. रंग काळा सावळा पण स्वभाव प्रभावित असेल तर चालेल पण रंग गोरा व स्वभाव वाकडा असेल तर चालणार नाही.
तुमचा सरळ स्वभाव हीच तुमची कसौटी आहे. तलवारीची किंमत तिच्या धारेवर होते, माणसाची किंमत त्याचे व्यवहारावर होते.
या जगतात आपला प्रवेश कसा ही झाला असला तरी हे जग सोडताना आपण आनंदी असले पाहिजे.
आपली सभ्यता आपला व्यवहार आपले लोक प्रियतेचे कारण बनु शकते. शाबासकीचे दोन शब्द अशक्य ते काम शक्य करु शकतात.
थोरा मोठ्यांचा मान ठेवणे, त्यांचेशी सभ्यतेने वागणे हा व्यवहार चतुर माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे.
दुसर्यांच्या चुका काढण्यापेक्षा स्वत:चे दोष पाहून ते दूर करण्याचा व्यवहार सतत करीत जावे.
आपण शेजार्याकडे पावशेर भाजी पाठविली तर तो उद्या अर्धाकिलो पक्वान्न आपणाकडे पाठवील हा तर निसर्गाचापण नियम आहे. आपण व्यवहार असा करा की शेजारच्या घराचे बांधकामासाठी पाणी द्या. तो तुमचे अडचणीचे वेळी तुम्हाला कांही गरज भासली तर तुमच्या साठी किमती पेट्रोल घेवून मदतीला येईल.
असा हा देण्या घेण्याचा आदर्श व्यवहार आपण ध्यानात घेऊ या.
अशा आदर्श व्यवहारातून अनेक चमत्कार पुढे येतील आपणाला अवघड वाटणारी कामे सहज पूर्ण होतील.