“वैद्यकिय क्षेत्रात काम करताना, रूग्णांना आयुष्यभर सेवा देताना, सात्त्विक वृत्ताने केलेले जीवनाचे अवलोकन केवळ परमोच्च आनंद देवून जाते. इतरांच्या वेदना दूर करताना परमेश्वराला शरण जावून त्याची केलेली भक्ती म्हणजेच रुग्णसेवा होय, याचा प्रत्यय या चिंतनातून येतो.”