तप म्हणजे तापणे – तपुनी तपस्वी होणे

तप  केल्याने पत वाढते. परमेश्वरापाशी आपली पत वाढते.

आपल्यावरचा विश्वास वाढतो म्हणून साधु संत, साधक सतत तप करीत असतात. जैन धमामध्ये या तपाला फार महत्व सांगितले आहे. तप याचा अर्थ तापणे – व तापून त्यातून उर्जा निर्मिती करणे.

तपातून नको असणारी उर्जा बाहेर फेकली जाते. नको त्या विकारांना बाहेर टाकले जाते. तपातून अनासक्त होण्याची क्रिया घडते त्यामुळे पर्युषण पर्वा मध्ये तपाचे फार महत्व सांगितले आहे.

प्रत्येकजण कर्म हे करीतच असतो हे करीत असताना कांही नको असलेली कर्मे आपणास चिकटलेली असतात.

तेव्हा प्रत्येक साधकाने आपणास ज्ञात होतील ती दुष्कर्मे नष्ट करण्यासाठी ‘तप’ करणे गरजेचे आहे.
तपाचे प्रकार –
1) नवकारशी – सूर्योदया नंतर 48 मिनीटांनी अन्न पाणी घेणे
2) बियांसण – दोन वेळाच भोजन घेणे.
3) अनशन – अन्नपाणी न घेता उपोषण करणे.
4) अयंबील तप – स्वाद रहित, हिरव्या पालेभाज्या रहित, कदमूळ रहित असे एक वेळा भोजन घेणे गरम पाणी घेणे, तेल, तूप याचा वापर न करणे.
5) निव्ही – एकच प्रकारचे एकच वस्तुच्या वापर करुन जेवण घेणे.
6) उपोषण – एक दिवसाचे – दोन दिवसाचे, आठ दिवसाचे, एक महिन्याचे –
7) वर्षतप – ठराविक तिथीला त्या प्रकारचा उपवास करणे.
8) अठ्ठम  तप – तीन दिवसाचे उपोषण करणे.

काम, क्रोध, मोह यावर ताबा मिळविण्यासाठी हे तप केले जाते. या तपातून आत्म्याची शुद्ध होते. हृदय शुद्धी होते व साधक मोक्ष मार्गाला लागतो.

आयुष्यात येवून एक पण तप केले नाही तर आयुष्य निष्फळ होईल. म्हणून प्रत्येकाने तपाचरण करावे.

Leave a comment