शोध घेणारा वैज्ञानिक असतो. साधु-संत महंत असतो.
वैज्ञानिक गरजेप्रमाणे रोज नवीन नवीन शोध सृष्टीमध्ये लावत असतो.
हे शोध त्याला प्रपंचात सुख समाधान देतील, त्याच्या गरजा भागवतील, पण आजची गरज संपली की उद्याची गरज समोर येते व हे चक्र थांबत नाही.
परमार्थात तुमची गरज नक्की केली असते. परमार्थात बाह्य गरजेकडे दुर्लक्ष केलेले असते. सर्व विषयावर नियंत्रण केले असते. तो एकट्याने करावयाचा मात्र असतो.
स्वत: स्वत:चा शोध घ्यावयाचा याचा अर्थ आत्मनिर्भर होणे, इतरावंर अवलंबून न रहाणे, आपले मन आपली बुद्धी काय सांगते याचा विचार करुन विवेकाने निर्णय घेणे होय.
स्वत: स्वत:चा शोध घेणे म्हणजे स्वत:च्या विचारामध्ये खोलवर जाणे, मी कोण आहे. मी कोठून आलो आहे, मी कशासाठी या पृथ्वीतलावर आलो आहे.
या पृथ्वीवर असणारे सर्व चराचर माझे स्नेही सोबती आहेत. त्यांची सुख-दु:खे मला माझी म्हणून पहावयाची आहेत.
अशा प्रकारे मला माझ्या मनाला समजावयाचे आहे. दुसरा कसा वागतो यापेक्षा मी कसे वागावे याचा शोध घेणे म्हणजे स्वत: स्वत:चा शोध घेणे होय.
स्वत:ला सुधारा जग आपोआप सुधारेल.
स्वत:च स्वत:चा शोध घ्या, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
1 Comment
Vrushali bhandari
Khup mast