शोध

‘गरज’ अथवा ‘कुतूहल, ही शोधाची जननी आहे.

आजच्या या वैज्ञानिक जगतात माणूस प्रत्येक गोष्टीत जिज्ञासेने काम करीत आहे.

हे असे का? याचा शोध घेत आहे व त्या शोधातून त्याला नव नविन गोष्टी ज्ञात होत आहेत.

जन्माला आल्यापासून आपण अनेक शोध घेत असतो.

जन्माला आलेले बालक आपण कोठे ओलो आहे? आपणाला कोणी आणले आहे ? आपण कोणाला आई-बाबा म्हणायचे? याचा मनांत शोध घेते.

ते बालक थोडे मोठे झाले की, त्याचे पालक त्याला कोणत्या शाळेत घालावयाचे याचा शोध घेतात.

शाळेत त्याला उत्तम शिक्षकाची साथ मिळावी यासाठी उत्तम गुरुचा शोध घेतला जातो.

शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांचा छंद, आवड पाहून तो कशात नैपुण्य मिळवू शकेल याचा शोध घेतात व तसे त्याला शिक्षण व प्रोत्साहन दिले जाते.

असे पुढे शोधत शोधत तो उच्चमाध्यमिक शाळेत जातो. तेथे त्याला कला, वाणिज्य, वैद्यकिय, अर्थ या पैकी कोणत्या शाखेत जायचे, याचा शोध घ्यावा लागतो.

आता एखादी पदवी संपादन केल्या नंतर विद्याविभुषित होण्यासाठी कोणता शोध निबंध लिहायचा याचा शोध घ्यावा लागतो.

हे शोध घेता घेता तो तारुण्यात प्रवेश करतो व त्याची शोध मोहिम आता प्रपंचाकडे वळते.

प्रपंच आनंदाने समाधानाने करता यावा यासाठी आर्थिक घडी व्यवसाय स्थापन करुन कशी बसविता येईल, याचा शोध घेण्याचे चालू होते.

प्रपंचाला चांगली जोड मिळावी यासाठी भक्कम आधार देणार साथीदार शोधल जातो. येथे प्रपंचाची गाडी भरधाव वेग घेते.

या प्रपंचाच्या गाडीत बसून मनुष्य अनेक शोध घेत घेत व्यवसाय, मुले-बाळे, घर, बंगला, मानसन्मान यांचे शोध घेत घेत एक प्रतिष्ठीत नागरिक बनतो.

या ठिकाणी तो प्रपंच आनंदात करुन आता सुखी जीवनाचा जेष्ठत्वाचा शोध घेवू लागतो.

प्रपंचाची गाडी वेगाने जात असते. विचार करण्यासाठी वेळ नसतो.

यावेळी जेष्ठत्व त्याला कांही विचार शोधण्यास प्रवृत्त करते.

कुठे थांबायचे? कसे रहावयाचे? आरोग्य कसे टिकवायचे? निस्पृह जीवन कसे जगायचे? रागलोभ, मोह, माया यावर कसा ताबा मिळवायचा. प्रपंचात प्रेमाचा शिडकाव कसा करावयाचा? श्रेष्ठत्व राखण्यासाठी भक्ती कशी करावयाची?

या सर्वांचे शोध म्हणजे आनंदी जीवनाची समज होय. ती समज यावी व वृद्धत्वाचे जीवन सुखी समाधानी व्हावे, यासाठी हा शोध निबंध आहे.

आपण आपला शोध नक्की करा..

1 Comment

  • Anonymous
    Posted September 5, 2022 8:21 am 0Likes

    Keep it up sirji
    Very good morning breakfast to brain

Leave a comment