संकल्प, नियम, ध्येय

जीवन जगत असताना काही ध्येय समोर असणे गरजेचे असते. ध्येया शिवाय जगणे हे नुसते जगणे होते. त्याला काहीच  अर्थ उरत नाही.

तेव्हा नविन वर्षात कांही ध्येय, संकल्प ठेवून जगण्याचा आपण प्रयत्न करुया. या संकल्पाची सुरवात स्वत:पासून करा. सोपे व छोटे छोटे संकल्प करा.

  •  स्वत:वर प्रेम करा.
  •  वडीलधार्‍यांना मान द्या.
  •  बचतीची सवय लावून घ्या.
  •  निरोगी रहाण्याचा प्रयत्न करा.
  •  चांगला मित्र, चांगला परिवार यांची संगत ठेवा.
  •  कोणत्याही व्यसनाचे आहारी जावू नका.
  •  भक्ती मार्गाने सर्व कर्मे करीत रहा.
  •  समाज सेवा करण्याचा प्रयत्न करा.
  • आपली आठवण आपल्या पश्चात राहिल असे काम करा.
  •  दूसर्‍यांच्या मतांचा आदर करा. विचारांती कामाला लागा.
  • आजची परिस्थिती, आजचा श्रीमंत उद्या राहिलच असे नाही. तेव्हा आजच्या श्रीमंतीचा किंवा तारुण्याचा गर्व करु नका.
  • चौकस बुद्धी ठेवा, कोणत्याही गोष्टींचा शोध घ्यावयास शिका.
  •  विजयी कथांचे स्मरण, वाचन करा.
  •  जगताना जे समोर येईल ते मान्य करुन समाधानी वृत्तीने जगण्याचा प्रयत्न करा.
  •  गेलेला क्षण परत येत नाही, हे ध्यानात ठेवून आलेले आयुष्य क्षणाक्षणाला आनंदाने जगण्याचा संकल्प करा.
  • चुकीची कबुली द्या.
  • दूसर्‍यांच्या मनाचा विचार करा.
  • चांगल्या गोष्टीचे कौतुक करा.
  • ऋणनिर्देश करण्याचे विसरु नका.
  • मी पणा सोडा. सर्वांना समजावून घ्या.
  • आनंदी हसतमुख राहा.
  • चांगल्या गुणांची पारख करा.
  • कुणाच्या व्यंगावर टीका करु नका.
  • स्वत:ची शक्ती आत्मविश्‍वास ओळखा.
  • टिका टिपणी करत वेळ घालवू नका.
  • कोणतेही काम करण्या आगोदर त्याचा विचार करा, नियोजन करा.
  • अपयशाचे खापर दूसर्‍याचे माथ्यावर फोडू नका.
  • क्रोधावर विजय मिळवा.
  • नेहमी सत्याचे बाजुने  रहा.
  • मित्रत्वाची भावना ठेवा.
  • इतरांशी चांगले संबंध ठेवा.
  • सुखाचा गुणाकार करा, दु:खाचा भागाकार करा.
  • बोलण्याआधी विचार करा.
  • स्वत:ची काळजी घेत घेत आपणावर अवलंबून असणार्‍याची चित्रे मनांत ठेवा.
  • प्रपंचात भान ठेवून वागा.
  • खोटा अहंकार ठेवू नका.

याप्रमाणे हे विचार मनांत ठेवून वागण्याचा संकल्प करा. जीवनाची संकल्पपूर्ती होईल, हा विश्‍वास मनांत ठेवा. तो विश्‍वासच तुमची संकल्प पूर्ती करेल.

1 Comment

  • Prasad Mehta
    Posted April 2, 2022 10:31 pm 0Likes

    संकल्प हा सिद्दीकडे नेत असतो, म्हणून संकल्प महत्वाचा मग तो छोटा असो,साधा असो किंवा अवघ‌ड असो. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ही एक म्हण आहे. प्रयत्न केल्याने सारे काही साध्य होते. तेव्हा नववर्षाच्या निमित्ताने छोटे छोटे संकल्प करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, प्रकाशभयींना नेमके हेच सांगायचे आहे असे मला वाटते.:प्रसाद मेहता (शब्दप्रसाद)

Leave a comment