संकल्प

आज एक एप्रील नविन वर्षाचा पहिला दिवस.

या प्रथमदिनी नवीन संकल्प करुया, खोटं नाही बोलत खरचं सांगतो,

प्रत्येकाने एक झाड लावून एप्रिल कुल करुया.

हा विचार नवा आहे. कल्पना पण नवीन आहे. हजारो रुपये खर्च करुन आपण एसी घरांत आणतो व एप्रीलला कुल करता.

आपल्याला सर्व पृथ्वीच कुल करावयाची आहे. तेव्हा सर्वांची साथ हवी आहे.

तेव्हा आज 1 एप्रीलला संकल्प करु एक झाड पोसण्याचा – वाढविण्याचा.

कुणाला हा संकल्प खोटा वाटेल. पण हे एप्रील फूल नसून एप्रील कुल आहे.

हे अनुभवाने ठरवा. सिमला कुलू मनाली येथे जा, तेथील लोकांनी केलेला संकल्प पहा त्या निसर्ग संपत्तीने तुम्ही तृप्त व्हाल.

तेथेच आम्हाला वाटते वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ! अशी वृक्षांशी सोयरीक करा.

ब्रम्हांडनायक आपणास सुचवित आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस संकल्प कर.

धरतीला शांत कर, त्यासाठी वृक्ष संगोपन कर. जीवन हे दूधाप्रमाणे निर्भेख आहे.

साखर व मीठ दोन्ही परमेश्‍वराने आपल्या हातात दिले आहेत. त्या दूधात साखर टाकून ते प्राशन करावयाचे कां मीठ टाकून नासवायचे हे विवेकी माणसाने ठरवायचे.

तेव्हा विवेकी बना, संकल्प करा, एक झाड लावा.

Leave a comment