प्रभु रे इतुके दे वरदान

प्रभु रे इतुके दे वरदान,

भक्तीभावे करुया पूजन करुया वंदन,

आत्म लक्षी करुया चिंतन, मिळवूया शाश्‍वत मुुक्तीधाम

प्रभु रे इतुके दे वरदान,

भक्तीभावे जिनरायाला करुया वंदन,

तपा जपाने प्रभु सेवेने संपवू संसाराचा त्राण,

प्रभु रे इतुके दे वरदान…

प्रत्येकाने आयुष्यात अशा प्रकारचा प्रयत्न करावा, अशी कर्मे करावीत त्यामुळे एकदिवस कृतार्थ झाल्याची भावना समोर येईल.

सारांश..
कृतार्थ होण्यासाठी
1. ध्येय निश्‍चिती गरजेची आहे.
2. त्या ध्येयावर प्रचंड प्रेम भक्ती असावी.
3. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी.
4. हे प्रयत्न मनापासून करावेत.
5. ऐहीक सुखाची भावना नसावी.

अशा विषयाच्या आसक्ती मुक्त प्रयत्नातून जे यश मिळते ते आपणाला कृतार्थ करुन सोडते. याचसाठी केला होता प्रपंच असे वाटते. मनुष्य जन्मातच कृतार्थ होण्याचे सामर्थ्य आहे.

आपण ते जरुर आजमवावे.

0

Leave a comment