प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे

प्रपंचाचे खरे सुख हवे असेल तर प्रयत्नाची पराकाष्ठा करावयाला लागते.

प्रयत्नानंतर काहीही अशक्य रहात नाही.

तुमचा प्रयत्न, सातत्य, निर्धार तुम्हाला यशाचे शिखरावर नेऊन ठेवील.

त्यासाठी या साध्या साध्या गोष्टी करा.

प्रतिभा परमेश्‍वराकडून मिळते म्हणून परमेश्‍वरासमोर नतमस्तक होवून रहा, तो परमेश्‍वर भेटे पर्यंत.

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल गळे हे सूत्र लक्षात ठेवा.

प्रपंच हा वाळवंटा सारखा आहे. त्याचे नंदनवन करायचे आहे. तेथे प्रयत्नाची शिकस्त करणे गरजेचे आहे.

प्रपंचात वावरत असताना आपले बोलणे, बोलण्याचा रोख, पट्टी सांभाळली तर त्या प्रयत्नाला नक्की चांगली साद मिळेल.

प्रपंचात आपण नजर स्थिर ठेवली, ध्येय निश्‍चित केले व त्याकडे लक्ष ठेवून प्रयत्न केले तर प्रपंच सुंदर, देखणा होईल.

प्रपंचात मौन ही गोष्ट प्रयत्नाने साध्य करावी लागते.

अनाठायी बडबड बंद करणे व मौनाचे आचरण केले तर जीवनांतील अशक्यप्राय आव्हाने तुम्ही जिंकू शकता.

प्रपंचाचा प्रवास हा लांब पल्याचा आहे. तेथे पोहोचण्याची ओढ आपणाला लागली आहे. अशा वेळी किती पल्ला गाठला व किती गाठणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पुढील वाटचाल करावी.

जरुर तेथे विश्रांती घ्यावी.

प्रपंचाच्या गाडीला जरुर तेथे ब्रेक लावणे गरजेचे असते.

काम, क्रोध, मद, मोह, लालसा ही प्रपंचातील वाळवंटातील वाळूचे कण आहेत.

त्यांना रगडून रगडून बाहेर काढले पाहिजे. तरच त्यातून प्रपंचाचे सुखाचे तेल गळेल.

कर्म करीत रहावे व ते कर्म भगवंताला अर्पण करावे.

हा माझा प्रपंच म्हणून ज्याने केला त्याचे जीवन आनंदी झाले.

प्रतिष्ठा प्राप्तीसाठी समाजाचे ऋणी व्हा.

बकुळीच्या फुलासारखे निरागस बना.

तेव्हा लक्षात ठेवा देवपूजेने आई मिळत नाही, तर आईची पूजा करुन देव मिळविता येतो.

तेथे लक्षात येते, प्रयत्ने वाळूचे कण रगडीचा तेलही गळे.

Leave a comment