याचा अर्थ समर्थ म्हणतात, कठीण समय येता कोण कामास येतो?
प्रपंच करीत असताना सर्व नातीगोती आपल्या भोवती कोंडाळा करुन बसलेली असतात.
प्रत्येकजण कांही आशा दाखवून सलगी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
पण प्रपंचातच हे लक्षात येते की अवघड प्रसंग आला की सगळेच अंग काढून घेतात. मदतीला येत नाहीत.
जोपर्यंत शरीरात आत्मा आहे. तोपर्यंत सर्वजण त्याचे सहाय्याने कर्म करीत असतात.
बायको, मुले, नातेवाईक पण वेळ येताच, कठीण प्रसंग येताच, आत्म्याने शरीराची साथ सोडताच, त्या शरीरापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात.
बायको दारापर्यंत साथ देते, नातेसंबंधी खांदा देवून स्मशानात नेऊन सोडतात. प्रत्यक्ष मुलगा जो त्याचा सर्वस्व असतो, तो त्याला चित्तेवर ठेवून त्याला अग्नीने डाग देतो. येथे हे म्हणणे पटते.
प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचा.
रामायणात पण आपण पाहिले दशरथ पुत्र राम याची पत्नी सीता तिला किती दु:ख सोसावे लागले. त्यावेळी जगाचा राजा असून त्या सीतामाईचे दु:ख तो कमी करु शकला नाही. ही रामाची परीक्षा होती. यावेळी ही हे उक्ती समोर आली.
प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचा.
रामाला देखील वडीलांचे आज्ञेपुढे कांही करता आले नाही. प्रत्यक्ष सूर्यापासून उत्पन्न झालेला मारुती वेळ येताच त्याला नाते झुगारुन कुंतीला कुमारी म्हणवून घ्यावं लागलं.
साक्षात कृष्णाची बहीण द्रौपदी ही फासावर (जुगारावर) लावली. पाचही पांडवांची राणी रानावनांत गेली, तीला पाच पती होते अशी पांचाली जिचा बंधू देव श्रीकृष्ण होता, तरी तिचे दु:ख कोणी कमी करु शकले नाही.
त्यामुळे संतांनी, समर्थांनी मानवाला दिलेला हा सल्ला योग्य वाटतो.
प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचा.
कोणाकडून कांही अपेक्षा ठेवू नका.
आपले विहित कर्म निरपेक्ष भावाने, प्रेमाने आचरण्याने करा.
तेथे जगद् निंदेची भिती ठेवू नका. तरच तेथे येईल देवदूत भेटायला.
तेथे असेही म्हणावे वाटते.
कठीण समय येता देवच कामांस येतो. म्हणून त्याचीच पूजा करा.
1 Comment
ङाॅ.निलेश फडे.
जीवनातील कटू सत्य. ङाॅ.निलेश फडे.