नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर मी घाई गडबडीने वृत्तपत्र वाचत होतो, वाचता वाचता माझे लक्ष एका बातमीवर गेले बातमीचे शिर्षक होते –
सरकारची पंतप्रधान नरेंद्र मोदीची नवी घोषणा
प्रत्येक बालकास मोफत दिली जाईल एक ‘कार’ त्या कारचे नांव असेल संस्कार.
मी थक्क होवून पहातच राहिलो. आमच्या वेळी साधी सायकलपण घरातून आम्हाला मिळत नव्हती आणि आता सरकार प्रत्येक बालकाला एक कार कशी देवू शकतो?
मी म्हणले, ही तर नरेंद्र मोदींची कमाल आहे.
ज्या माणसाजवळ देशप्रेम आहे, स्वदेशाबद्दल आदर आहे, आपुलकी आहे, तो माणूस देशातील प्रत्येक बालकावर चांगले संस्कार घडावेत त्याची प्रगती व्हावी या दृष्टीने अशी योजना नक्की काढेल. त्यापैकी नरेंद्र मोदी आहेत म्हणून मी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
त्यांनी पुढे म्हणले आहे, आपण बालकाला त्याचे वाढदिवशी कांही ना काही भेट देतो, कुणी चांगली चांगली पुस्तके देतात. कुणी वस्तु कपडे, खेळणी त्या वस्तुमध्ये दुजाभाव, श्रीमंती, गरीबी असा फरक दिसतो.
तेथे काहीवेळा अहंकार किंवा नैराष्य दिसते. तेव्हा या विषयावर लोकसभेत चर्चा झाली व तेथे एकमताने हा ठराव पास करण्यात आला.
देशातील प्रत्येक बालकाला स्वदेशी बनावटीची एक ‘‘कार’’ देण्यात येईल. तेथे श्रीमंत-गरीब हा भेद असणार नाही. ‘कार’ चे नांव असेल “संस्कार”.
या एका घोषणेमुळे एवढे परीवर्तन झाले की प्रत्येक बालकाच्या मनात देशप्रेम उत्पन्न झाले.
त्याला लहानपणापासून ‘कार’ चे महत्व समजून आले.
घरांत असलेल्या आजी आजोबांना दिलासा मिळाला. लहान मुलांवर कार चालकाचे संस्कार घडविण्याचा उद्योग जेष्ठांना मिळाला.
शाळेत गुरुजनांना मान सन्मान मिळू लागला. सर्वजण एकमेकांशी प्रेमाने वागु लागले.
सर्वत्र आनंदी आनंद झाला. कुठे मोठी ईर्षा अहंकार दिसेनासा झाला. असा आनंदी आनंद एका घोषणेमुळे झाला.
1) या कारमधून प्रत्येक बालकावर चांगले संस्कार घडतील.
2) त्या बालकामध्ये देशप्रेम वाढेल.
3) सर्वांसाठी समान भेट यामुळे कुठे रुसवा फुगवा दिसणार नाही.
4) पूर्वंपार चालत आलेले संस्कार पुढे जपले जातील.
5) घरातील प्रत्येक जेष्टाला गुरुवर्यांना उद्योग मिळेल.
6) प्रत्येकजण आत्मनिर्भर होईल ,स्वत:च्या पायावर उभा राहील.
आजच्या काळात या गोष्टीची प्रकर्षाने गरज वाटत आहे तरी या घोषणेतून पूर्ण होईल ही आशा.
आत्मनिर्भर देश-स्वदेशीचा पुरस्कार या गोष्टी घेवून आलेल्या या घोषणे बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन.
( मला पडलेले हे स्वप्नं खरे ठरो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.)