पाढा अडीच अक्षरांचा

लहानपणा पासून पाढे पाठ करणे, ते करवून घेणे हे तंत्र पहात आलो.

त्यामुळे 1 ते 100, बे चे पाढे असे अनेक पाढे, पावकी, निमकी, अडीचकी असे पण पाढे पाठ करुन घेतले.

आज मात्र हा नवा पाढा डोळ्या समोर आला तो म्हणजे अडीच अक्षरांचा पाढा यामध्ये काय काय येते ते आपण पाहू.

अडीच अक्षराचा कृष्ण,

अडीच अक्षरांची भक्ती,

अडीच अक्षरांची श्रद्धा,

अडीच अक्षरांची शक्ती,

अडीच अक्षरांची कांता,

अडीच अक्षरांची दुर्वा,

अडीच अक्षरांची इच्छा,

अडीच अक्षरांचा योद्धा,

अडीच अक्षरांचे ध्यान,

अडीच अक्षरांचा त्याग,

अडीच अक्षरांचे कर्म,

तो अडीच अक्षरांचाच धर्म,

अडीच अक्षरांत भाग्य,

अडीच अक्षरांतच व्यर्थ,

बाकी सारे मिथ्या,

अडीच अक्षरात संत,

अडीच अक्षरांचा ग्रंथ,

अडीच अक्षरांचा मंत्र,

नी अडीच अक्षरांचे यंत्र,

अडीच अक्षरांची तुष्टी,

अडीच अक्षरांची वृत्ती,

अडीच अक्षरांचा श्वास,

नी अडीच अक्षरांतच प्राण.

अडीच अक्षरांचा मृत्यू,

अडीच अक्षरांच जन्म,

अडीच अक्षरांचाच अस्थि,

अडीच अक्षरांचा अग्नी,

अडीच अक्षरांचा ध्वनी,

अडीच अक्षरांचा मित्र,

अडीच अक्षरांचे सत्य,

अडीच अक्षरांचे वित्त.

असे हे जन्मापासून मृत्यूपर्यंत अडीच अक्षरांचे बांधलेले आयुष्य मानवाचे, नाही कुणा उमगले.

Leave a comment