स्वागत हे निरनिराळ्या ठिकाणी करावे लागते. निरनिराळ्या समारंभासाठी कार्यक्रमासाठी लग्नात अशा स्वागताची योजना केली असते.
अशा कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत करणे गरजेचे असते. तेव्हा हे काम जेष्ठांकडे दिले जाते. ते या कार्यक्रमात आलेल्या आमंत्रितांचे स्वागत करीत असतात. येणार्या माणसांना पण त्यामुळे आनंद वाटतो. असे स्वागत समारंभ जीवनांत अनेक ठिकाणी पहावयास मिळतात.
एखाद्याची सेवा निवृत्ती येते तेथे निवृत्ती समारंभ होतो, त्याच जागेवर दुसर्याची नियुक्ती होते तेथे त्याचा स्वागत समारंभ होतो.
आता माझ्या जेष्ठ नागरीक बंधुंनो प्रपंच करुन तुम्ही जीवनाचे तीसर्या टप्यावर आला आहात. प्रपंचातून तुम्हाला निवृत्ती घ्यावयाची आहे. त्याच बरोबर जेेष्ठत्वात जायचे आहे.
तेव्हा या निवृत्ती व जेष्ठात प्रवृत्ती या दुहेरी कार्यक्रमात तुमचा सहभाग पहावयाचा आहे. तेंव्हा हा कार्यक्रम कसा नियोजन बद्ध होईल ते आपण पाहू या.
निवृत्ती याचा अर्थ एका कामातून मुक्त होऊन दुसर्या कामात सहभाग होणे. प्रपंचाच्या जबाबदारीतून मुक्त होवून जेष्ठत्वाच्या शिखरावर विराजमान होणे ही जेष्ठत्वाची भावना या निवृत्तीतून मनांत रुजली पाहिजे.
येथे निवृत्तीचे दु:ख करीत बसण्यापेक्षा जेष्ठत्वाचे शिखर गाठल्याचा आनंद मनांत झाला पाहिजे. निवृत्तीचे दु:ख मनात ठेवू नका सकारात्मक रहा, निराश होवू नका.
यापुढे येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक संधी प्रत्येक वेळ आनंदाची पर्वणी समजून त्या पर्वणीचा आनंद लुटा.
आनंदाची किल्ली तुमच्याच कमरेला आहे, हे विसरु नका. जरुर त्यावेळी ती किती इतरांचे हाती सोपविण्याची तयारी ठेवा.
या वयात कोणतीही जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करु नका. इतरांवर जबाबदारी सोपविण्याची कला अवगत करा.
मोठ्या अपेक्षा ठेवू नका. ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत त्यात समाधान मानायला शिका.
प्रपंच म्हटले की कटकटी आल्या त्या कशा टाळता येतील हे शिकून घ्या. यातून विश्रांती व आराम कसा मिळेल याकडे लक्ष द्या.
क्षणोक्षणी सृष्टीमध्ये बदल हे घडतच असतात. त्या बदलाकडे त्रयस्थपणे पहाण्याची सवय करा, उगाच आमच्यावेळी… असा पाढा मुलांसमोर वाचत जावू नका.
नवीन गोेष्टी कशा स्विकारता येतील हे पहा . आरोग्य संपन्न रहा.
दिनचर्या- उठणे पासून निद्रेपर्यंत आखून त्याप्रमाणे वागा. योग्य आहार, विहार, व्यायाम योगासने करा, भरपूर पाणी प्या, सकाळच्या ताज्या हवेत फिरावयास जा, वेळेवर औषधे घ्या.
निवृत्ती मुळे आळशी न बनता सक्रिय रहा. मीठ,तिखट, साखर यांचे प्रमाणात सेवन करा.
धावपळ करणे, कुठे मध्यस्थी करणे टाळा. हास्य विनोद करा, दुसर्यांनी केलेल्या विनोदाला साद द्या. स्वत:चे मनोबल वाढवा, एखाद्या सुंदर छंद जोपासा.
पैशासाठी कुणावर अवलंबून राहू नका, आपली पेन्शन, आपला लाभांश यावर कसा चरितार्थ चालेल याचे नियोजन करा. पुर्वीपासून आलेली बचतीची सवय मोडू नका, जरुर वाटले तर समन्वय नसेल तर इच्छापत्र करुन ठेवा.
स्वत:च्या वैयक्तिक आनंदासाठी खर्च करावयाचा असतो हे विसरु नका. कुटूंबीयांनी विचारले तर सल्ला द्या अशा प्रकारे वर्तन ठेवून प्रपंचाची निवृत्ती स्विकारा.
त्याच बरोबर परमार्थाचे स्वागत करा, निवृत्ती ही शिक्षा नाही, तर तुमची बढती आहे हे लक्षात घेवून आनंदाने, प्रेमाने ती निवृत्ती स्विकारा.
असा साधक निवृत्तीचे स्वागत करतो व परमार्थात पदार्पण करतो. तेथे त्याचे स्वागत होते व त्याचे जीवन आनंदाची पर्वणीच होवून जाते.
यासाठी निवृत्तीचे स्वागत प्रत्येकाने करा.
1 Comment
सौ. शीला केतकर
पहिल्या व्यवसायातून निवृत्त होऊन ज्येष्ठत्वाची भावना मनामध्ये रुजवणे ही एक कला आहे ती जमली पाहिजे.
निवृत्तीनंतर कशा प्रकारे आपली लाईफस्टाईल ठेवावी याबद्दल डॉक्टर साहेबांनी फारच छान मार्गदर्शन केले आहे व्यायाम आहार विहार इत्यादी तसेच आळस सोडून उत्साही राहणे.
छान
🙏 राम कृष्ण हरी🙏