सम्राट याचा अर्थ सर्वांवर विजय मिळविणारा, सर्व गुणांनी संपन्न असा.
जीवन हे एक तीन प्रवेशाचे नाटक आहे. त्या जीवनाच्या नाटकामधील प्रत्येकाला आपापली भूमिका करावीच लागते.
कांहीजण आनंदाने, कांहीजण परिस्थितीने, कांहीजण एख्यासाने ती भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करतात. अशा या नाटकाच्या रंगमंचावर उभे रहाण्याची संधी आली तरी कांही जण पडद्याआडून आपली भूमिका करीत असतात. पडदा पाडणे, सजावट करणे ही कामे पण त्यांना करावी लागतात.
मात्र कांहीजण आपली भूमिका ध्येयाने प्रेरित होवून विचार मंथन करुन कशी प्रभावी ठरेल या दृष्टीने प्रयत्न करीत असतात. त्यांना रंगभूमि व प्रेक्षक साद देतात. त्यांची निरनिराळी नाटके व त्यातील भूमिका प्रेक्षकांना वेड लावून सोडतात.
अशा निरनिराळ्या नाटकात भूमिका करत करत तो नट-नटसम्राट नाटकांत नटसम्राट होतो. यशाचे उत्तमोत्तम पदावर विराजमान होतो तो नटसम्राट होतो.
त्याने प्रेक्षकांची मने जिंकली असतात. नाट्य जगतात तो सम्राट झालेला असतो. राजाकरणात अनेक शत्रुंना हरवून सत्ता संपन्न करणारा सम्राट अशोक सारखा राजा होतो.
असा सम्राट सर्व गुण संपन्न असतो. त्याला जी भूमिका दिली जाते ती भूमिका तो एकनिष्ठेने त्या भूमिकेशी समरस होवून वढवत असतो.
प्रपंचात राजा असणारा नाटकांत भिकार्याची भूमिका उत्तम पार पडतो. प्रेक्षक त्याच्या भूमिकेकडे पाहून त्याला दाद देतात.
आपणाला आपल्या या जीवनाचे नाटकामध्ये भाग घ्यावयाचा आहे. नुसता भाग घ्यायचा नाही तर त्या नाटकामध्ये नटसम्राट व्हायचे आहे.
परिस्थिती कशीपण येवो नाटकात मात्र दिलेली भूमिका एकरुप होवून करावयाची आहे.
जो याप्रमाणे आपली भूमिका सादर करतो तो जीवनाच्या नाटकात ‘नटसम्राट’ होतो.
ज्याला जीवनाचे नाटकात शतकोत्तर प्रयोग करावयाचे आहेत त्याने रोज स्वत:ला आरशात पहावे. भूमिकेप्रमाणे पेहराव करावा व नटसम्राट व्हावे.