जागतिक आरोग्य दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा.
आजचा विषय आहे निसर्ग कसा मानवाची सेवा करतो.
खूप उपयोगी आहे निसर्ग, आपण मात्र त्याकडे पहात नाही. त्याचे गुणधर्म जाणून घेत नाही. तेव्हा रोजच्या जीवनात होणारे त्रास, आजार आपण कसे कमी करु शकतो यावर चिंतन करुया.
लहान बाळकापासून 90 वर्षाच्या वृद्धा पर्यंत उपयोगी पडणारे तेल म्हणजे नारळ तेल होय.
कुणाला पाठदुखी असते, कुणाला सांधेदुखी असते. कुणाची नजर क्षीण होते. कुणाला निद्रानाशाचा त्रास असतो, तर कुणाला पोटाचे विकार असतात.
हे सर्व त्रास रात्री झोपणेपूर्वी तळपायाला पांच थेंब नारळ तेल लावून मालिश केल्याने कमी होतात. रुग्णांना शांत झोप लागते.
या प्रक्रियेमुळे लहान बालके पण आनंदी आणि निरोगी रहातात. काही रुग्णांना पाय सुजतात, चालताना थकवा येतो या पासून आराम मिळण्यासाठी नारळ तेलाचे मॉलिश उपयुक्त ठरते.
शांत झोप लागण्यासाठी झोपेच्या गोळ्यापेक्षा ही प्रक्रिया चांगली वाटते.
पायाची जळजळ, डोकेदुखी या गोष्टी कमी होतात. थायरॉईड या आजारात ग्रंथींचे संतुलन योग्य प्रमाणात होण्यासाठी नारळ तेलाचा वापर तो पण 5 थेंब व मॉलीश हे प्रभावी औषध आहे, करुन पहा.
जुनाट मुळव्याधीची तक्रार नारळतेळ तळहातावर, बोटाच्या, नखाच्या दरम्यान आणि नखावर चोळण्यानी नाहीशी होते.
बद्धकोष्टता – यासाठी नारळतेलाचे 4 ते 5 थेंब नाभीवर घातल्याने ही तक्रार समूळ नष्ट होते. घोरणे कमी होते.
नारळ तेलाचे मॉलीश डाव्या उजव्या तळव्यावर तीन तीन मिनीटे करा.
आयुष्यभर आरोग्यदायी जीवन जगा.
पायाखाली 100 अॅक्युप्रेशर पॉईंट असतात. ते अवयव दाबून व मालिश करुन अनेक आजार बंद होतात.
आरोग्य दिना निमित्त सप्रेम भेट…!