मंत्र, जप, माला

मंत्र, जप, माला ही परमार्थातील साधने आहेत. माणासाला नामात स्थिर होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्यात मंत्र, जप व माला या गोष्टींना महत्व दिले आहे. तेव्हा या प्रत्येकाची आपण माहिती घेऊ.

मंत्र : योगीक काळापासून पूरातन काळा पासून मंत्र सांगितले आहेत. निरनिराळ्या संतांनी मंत्र तयार केले व ते साधकाला दिले.

या मंत्रामध्ये प्रकार आहेत, ते असे..
एकाक्षरी, द्विअक्षरी, तीनाक्षरी, चातुराक्षरी, पंचाक्षरी, षडाक्षरी, सप्ताक्षरी, अष्टाक्षरी, नवाक्षरी असे एक पासून 10 अक्षरांपर्यंत असलेले मंत्र आहेत.

हे मंत्र हाताच्या बोटावर मोजता येतात. एका पासून दहा पर्यंत व दहातून एका पर्यंत या मत्रांद्वारे जाता येते.

त्या त्या मंत्राची ताकद साधकाला तारण्यासाठी उपयोगी ठरते.

हे मंत्र गुरुकडून घेतले जातात. त्यांत त्यांची तपश्‍चर्या, अनुभव याचा प्रभाव असतो. त्यामुळे मंत्र हा स्वत: कधी घेऊ नये. त्यामध्ये माझा मंत्र हा अहंकार दडलेला असतो.

मंत्र घेतल्यानंतर त्या मंत्राचे अनुसंधान ठेऊन त्याचे पारायण करावयाचे असते. येथे जाप सुरु होतो.

काही मंत्र विशिष्ठ समयी, विशिष्ठ ठिकाणी उच्चारले जातात. काही मंत्र पठणानंतर समोर येणारी विघ्न दूर करतात.

यासाठी जाप हा मंत्र मांडण्याचे परिमाण मानले जाते कोणी मंत्राचा एकवेळा … शंभर वेळा, 108 वेळा, कोटी कोटी वेळा जाप करतात व आपली अपेक्षा पुर्तीची वाट पहातत.

पण जाप जर एकांतात मनांतल्या मनांत , कोणत्याही परिस्थितीत केला, अखंड श्‍वासाबरोबर चालू ठेवला तर सर्व मनोकामना पूर्ण होतील व इष्ट फलप्राप्ती होईल.

अशा मंत्राचे 108 वेळा पारायण करणे फार महत्वाचे सांगीतले आहे.

त्या योगे देवाधिदेव, तीर्थंकर भगवंतातील गुणांचे आपल्यात संक्रमण होते व आपण मोक्षाच्या मार्गावर चालू लागतो.

मंत्राचे नित्यनैमित्तीक जाप करण्यामुळे 108 मण्यांच्या माळा जपण्याने चित्तशुद्धी व शांती प्राप्त होते.

तसा प्रयत्न करावा..

Leave a comment