कदर याचा अर्थ जाणीव.
मानव म्हणून जन्म घेतल्यावर त्या मानवाने मानवतेची कदर करणे गरजेचे आहे.
जर निर्जीवे वस्तु एकमेकांची कदर करतात. तर मानवाने माणुसकीची कदर कां करु नये ?
निर्जीव पेन्सीलीने लिहीलेल्याची कदर करणेसाठी खोडरबर त्यामधे दुरुस्ती करण्यात मदत करुन तिची कदर करतो.
तर एखाद्या दु:खी मानवाचे दुख कमी करण्याचा माणसाने प्रयत्न कां करु नये?
प्रत्येक गोष्ट आपल्या धर्माप्रमाणे बोलत जातात.
फुल आपल्या धर्माप्रमाणे फुलत सुगंध देत जाते मग माणूस म्हणून जन्म घेतल्यावर मानवता धर्म कां पाळू नये ?
मंदीरात स्थापित केलेल्या देवामध्ये आपण देवपण पहातो तसे मंदीराबाहेर बसलेल्या भिकार्यामध्ये पण देव आहे. ते पहा व त्याला मदत करा. तेथे मानवतेची कदर केली जाईल.
शिर्डीचे साई बाबा आपले स्वरुप नेहमी श्वान व भिकारी या स्वरुपात प्रकट करीत असतं. कारण भुकेल्याला अन्न आणि भूक प्राण्यांना घास, हा मानव धर्म त्यांनी ओळखला तेथे मानवतेची कदर झाली.
शस्त्राने, हत्याराने आपण दूरची शिकार करु शकतो. पण आपल्या हाताने एकाद्या भुकेलेल्या गरीबाला भाकरी दिली तर स्वर्गाचे दार आपणासाठी उघडले जाईल.
हे उदाहरण पण आपणास मानवतेची कदर करणेस प्रवृत्त करीत आहे.
रस्त्याने जाताना निर्जीव मंदिरे पाहून आपण थांबतो. दोन हात जोडून नमस्कार करतो. तर रस्त्याने जाताना एखादी रुग्णवाहिका जाताना दिसली तर त्यातील रुग्णाला स्वास्थ लाभो अशी प्रार्थना करणे ही मानवतेची कदर होय.
कष्टकर्या मजुराची मजुरी त्याने मागण्या आगोदर त्याचे हातात ठेवा. तेथे तुमचा भाग्योदय मानवतेची कदर केली जाईल.
गोर गरीब मुलांसाठी शाळा काढणे, त्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणे यातून पण मानवतेची कदर दिसून येते.
कांही लोक स्वत: खाऊन पिवून समाधानी होतात. तर कांही इतरांना खावू घालून समाधानी करण्याची ताकद देवो हीच खरी मानवतेची कदर होय.
1 Comment
सो. शिला केतकर
खरोखरच मानवतेची कदर करणे अत्यंत आवश्यक आहे खऱ्या गरिबाला अन्न देऊन आपण तृप्त होणे
एखाद्या रुग्णाच्या स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करणे👌
पण आपल्या हे लक्षात येत नाही प्रकाश सर आपल्या लिखाणाने हे लक्षात येते मानवता कोठे कोठे आहे आणि त्याची कदर कशी करावी🙏