जानेवारी महिना म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात .
संक्रांत हा नविन वर्षाचा पहिला स्त्रियांचा सण समजला जातो.
या सणाची सुरवात 13 जानेवारी भोगीच्या शुभेच्छेने होते.
या दिवशी अंगणात सडा सारवण करुन शुभेच्छा येतात. त्या शुभेच्छांनी दु:खाचे डोंगर तीळ तीळ होवून नष्ट होतात.
तिळा बरोबर येतो गुळ, तो सर्वत्र आनंदी आनंद वाटत येतो. या तिळगुळातून जीवन कसे सुख दु:खाने भरले आहे. हे समोर येते.
नवीन लग्न झालेल्या युवतींना हा तिळगुण म्हणजे माहेर सासरचा आहेरच वाटतो. माहेर सोडल्याचे दु:ख व सासर मिळाल्याचा आनंद हाच तिचा तिळगूळ असतो. अशी ही सुखदु:खाची देवाण घेवाण या सणामध्ये होत असते.
पहाना- स्वत:च्या मालकीचा साखर कारखाना असणारा मधुमेही चिमटभर साखर खाऊ शकत नाही. त्याला कोणी साखर खावू देत नाही.
तर कष्टाने घाम गाळून कामाचे मोल घेणारा व त्यामोलाची भाकर खावून आनंदी आनंद भोगणारा श्रमीक त्याची कुणाशी जोड नाही. जीवनाचा आनंद श्रीमंतांचे जवळ नसतो तर तो त्यांचेजवळ असतो जो इतरांना कांहीतरी देण्यासाठी कष्ट करीत असतो.
असे दातृत्व लहान लहान बालकांमध्ये यावे यासाठी संक्रांतीला तिळगुळाची देवाण घेवाण करतात. तिळगुळ घ्या गोडबोला हा संदेश पसरवीतात.
नववर्षात येणारी सुखदु:खे या तिळगुळाचे रुपाने तुम्ही पचवा मोठ्यांना होणारे दु:ख लहानांच्या तिळगुळांनी परिवर्तीत होवो ही यातील भावना असते. हा विचार मनांत ठेवून प्रत्येक घरांत सौभाग्याचे लेणे वाण वाटत वाटत नव युवती हा सण साजरा करतात.
असा हा संक्रांत सण म्हणजे निसर्गाचे संक्रमण, प्रपंचात दु:खाचे सुखात संक्रमण करणे, मानसिक भावना बदलणे, सकारात्मक दृष्टी करणे हा या सणाचा हेतू असतो.
निसर्गात या दिवसापासून सूर्य मोठा मोठा होत जातो व रात्र कणाकणाने लहान लहान होत जाते. तसे या संक्रांतीच्या सणापासून आपले दु:ख कमी कमी होत जावो व सुख वाढत जावो, ही प्रार्थना.
या सणानिमित्त समोर आलेली एक कविता
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा,
उडत चालले टणा टणा.
वाटेत भेटला तिळाचा कण,
हसायला लागले तिघेही जण.
तिळा तिळा कसली रे ही गडबड?
सांगायला वेळ नाही, थांबायला वेळ नाही,
तीळ चालला भरभर, थांबत नाही पळभर.
वाटेत लागले ताईचे घर, तीळ शिरला आंत थेट स्वयंपाक घरांत.
ताईच्या पुढ्यात रिकामी परात,
हलवा करायला तिळ नाही घरात,
ताई बसली रुसून, तीळ म्हणाला हासून,
घाल मला पाकांत, हलवा करं झोकांत,
ताईने घेतला तीळ परातीत, चमच्याने थेंब थेंब
पाक ओतीत, इकडून तिकडे बसली हलवीत,
शेगडी पेटली रसरसून, वाटाणा फुटाणा गेले घाबरुन,
पण तीळ पहा कसा – हाय नाही, हुई नाही, हसे फसा फसा,
वाटाणा फुटाणा पाहिलेत ना एवढासा म्हणून हसतोस ना..!
अशी आहे कणभर तिळाची मणभर करामत, विसरु नका यांची गम्मत.