झेप.. प्रपंचातून.. परमार्थाकडे

बोलावे बरे, बोलावे खरे॥
कोणाच्याही मनावर पाडू नये गरे॥

थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे
शब्दामुळे दंगल, शब्दामुळे मंगल॥

शब्दांचे हे जंगल जागृत रहावं ॥
जीभेवर ताबा सर्वसुख दाता ॥

पाणी, वाणी, नाणी नासू नये,

हा पूर्वजांचा संदेश ॥

माणुसकी – घरांतील तिजोरी आहे,

गोड शब्द – घरांतील धनदौलत आहे.

शांतता – घरांतील लक्ष्मी आहे.

आत्मविश्‍वास – घरांतील देवस्थान आहे.

दुजाभाव विसरणे – घरांतील तेजस्वी समई आहे.

पैसा – घराचा पाहुणा आहे.

गर्विष्ठपणा – घराचा वैरी आहे.

अहंकार – घराचा सर्वनाश आहे.

नम्रता – घराची प्रतिष्ठा आहे.

व्यवस्था – घराची शोभा आहे.

समाधान – घराचे सुख आहे.

चारित्र्य संपन्नता – घराची किर्ती आहे.

प्रभुचा वास – अशाच घरात नेहमी आहे.

कर्ज होईल असा खर्च करु नका, पाप होईल अशी कमाई करु नका,
दु:ख होईल असे बोलू नका, चिंता होईल इतके खाऊ नका,

जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल.

काही मिळाले तर नशीबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की,
परमेश्‍वराला देणे भाग पडेल.

निती हरपली, बरकत संपली.. माझे बुडवशील, तु बुडशील ॥

असा विवेकी सल्ला देवून माझे बंधू मंगळवार दि. 30/3/2021 सायं. 7 वाजता इहलोक यात्रा पार करुन परलोकात गेले.

सुहास चे सुहास्य सदैव स्मरणात राहील ……

Leave a comment