जाग

जाग, जागृती, झोपेतून जागे होणे, चैतन्य उत्पन्न होणे, मरगळ नष्ट होणे अशा विविध छटा या जाग शब्दातून निघतात.

जाग येते तेव्हा आपण अंधारातून प्रकाशाकडे जातो अज्ञानातून ज्ञानाची अनुभूती होते.

निद्रा म्हणजे झोपणे. निद्रेतून जागे होणे म्हणजे जाग येणे होय.

मनुष्य जीवनात पण याची प्रचिती येते. माणूस जन्म घेतो त्या वेळी त्याला जाग येते व तो अनंतात विलीन होतो(मरतो) त्यावेळी तो निद्रीत अवस्थेत जातो.

जाग व निद्रा य मधील जो काळ त्याला जगणे म्हणतात.

हा काळ फार महत्वाचा असतो. मनुष्य जन्म मिळाल्यावर आपल्याला काया करावयाचे आहे. याची जाणीव करुन घेणे गरजेेचे असते.

गाडीचा ड्रायव्हर कधी निद्रावस्थेत गाडी चालवत नाही. त्याला योग्य ठिकाण गाठण्यासाठी जागरण करणे गरजेचे असते.

आपण पण या प्रपंचाच्या गाडीचे ड्रायव्हर आहोत. याची जाग (जाणीव) आपण सतत मनांत ठेवली पाहिजे. बालक पण जन्माचे आगोदर मातेच्या उदरात नऊ महिने निद्रावस्थेत असते व नंतर त्याला जागृती होते व ते गर्भातून बाहेर पडते.

बाहेर पडल्यावर जे बालक जगाचे निरिक्षण करते ते थोडे संभ्रमावस्थेत असते. रडून रडून मी कोण आहे, कशासाठी आलो आहे, मला कुणाकडे जायचे आहे याचा शोध घेऊ लागते. दिवसेंदिवस त्याला आपले घर आपले गांव याची जाणीव होवू लागते. हळूहळू आपले कोण? इतर कोण याची जाणीव होऊ लागते.

पुढे वैवाहिक जीवन सुरु होते. अनेक समस्या समोर उभ्या रहातात, त्यातून मार्ग काढण्यासाठी लोक देवाला साकडे घालतात, जागरण करतात. उद्देश हाच असतो कि, परमेश्‍वराने आपणास बुद्धी द्यावी.

प्रपंच व्यवस्थित चालावा म्हणून हा पण एक जागरणाचा प्रकार आहे.
जेव्हा महाकाय देशावर मोठे संकट येते. करोना सारखे संकट उभे रहाते. धोक्याचा थांगपत्ता लागत नाही. अशा वेळी परमार्थात योगी पुरुष जन्म घेतात.खंबीरपणे जगा समोर उभे रहातात व जगाला हाक देतात – जागो, जागे व्हा. देशाला व मनुष्य जमातीला वाचविण्यासाठी सज्ज व्हा, निद्रीत अवस्थेत राहू नका.

निसर्गात पक्षी सुद्धा कशी साद घालतात पहा. पहाट झाली की चिमण्यांचा चिवचिवाट, किलबील सुरु होते. त्या किलकिलाटाने आपणांस जाग येते. निसर्गातील कळ्या, फुले जाग येताच उमलू लागतात. फुलांचा सुगंध सर्वत्र पसरतो , उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हामुळे व उकाड्यामुळे आपणास झोप लागत नाही. तेंव्हा आपण पंखा चालू करतो व त्या वार्‍याने आपल्याला शांतता लाभते. हीपण ऐक जागेची अनुभूती आहे.

दिवसभरातील प्रत्येक घटनेमागे जाग हेच मुख्य तत्व असते.

जर जाग नसेल तर डोळे असून अंधळे हे तत्व ध्यानात ठेवले पाहिजे.

यातून जेष्ठ नागरिकांनी काय बोध घ्यावयाचा. जसे तुम्ही जेष्ठ होता, तशी तुमची निद्रा कमी कमी होत जाते. बहुतेक वेळा जेष्ठ हे जागृतच असतात. त्याचे जवळ अनुभवाचा ठेवा असतो.

जेष्ठांनी तो अनुभवाचा ठेवा पर्वणी म्हणून तरुणांना वाटावयाचा असतो हे करत असताना , मी सांगतो तसेच वागा असा हट्ट नसावा .

त्या तरुणांना प्रेमाने जे सांगायचे आहे ते सांगा. त्यांचेवर प्रेमाची साद घाला व पहात रहा काय चमस्कार घडतो.

त्या तरुणांचे पंखात बळ उत्पन्न होईल. त्यांना त्रास देणारी दु:खे कमी कमी होत जातील. या साठी मनाला निद्रावस्थेत जागृत करुन चांगले विचार त्यांचे डोळ्यासमोर येतील असा प्रयत्न करा. त्यातून त्याचे मध्ये सकारात्कम विचार प्रगट होतील व ती तरुण मंडळी प्रगतीचे मार्गावर जातील.

माझे आता काय राहिलेेे आहे असे म्हणण्यापेक्षा मला अजून खूप करावयाचे आहे. त्यासाठी मला आयुष्यातील क्षण क्षण कामी लावायचा आहे अशी जाग जेष्ठांनी ठेवली पाहिजे. एका ठिकाणी स्थिर राहून पुढील पिढी समोर चांगला आदर्श ठेवला पाहिजे.

त्यासाठी कांही संकल्पना समोर ठेवणे गरजेचे आहे. त्या अशा
1. मला कोेणाशी वैर ठेवायचे नाही.
2. जगातील सर्व लोक सुखी असावेत ही सतत प्रार्थना करावी.
3. मन, वचन, काया द्वारे मी कुणाला दुखविले असेल तर त्यांनी मला क्षमा करावी.
4. परमेश्‍वर सर्वत्र भरलेला आहे. तो सर्वांचे आत्म्यामध्ये वास करतोआहे.

तेव्हा कोणत्याही प्रकारचे तुम्ही कर्म करा त्याचे फळ त्या परमेश्‍वराचे इच्छेने मिळते तेव्हा फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा व केलेले कर्म परमेश्‍वराला अर्पण करा.
5. परस्त्री माते समान माना.
6. मद्, मोह, माया, लोभ, आसक्ती या पासून अलिप्त रहाण्याचा प्रयत्न करा.

7.वितरागी-अरिहंत, साधू, संत यांचे सानिध्यात रहाण्याचा प्रयास करा. यासाठी नेहमी मनांत जाग ठेवा.

1 Comment

  • सौ. शीला केतकर
    Posted November 11, 2022 9:14 pm 0Likes

    जाग आणि निद्रा यांच्यामधील काळ म्हणजे आयुष्य हे वाक्य फार आवडले.
    जागृती म्हणजे चैतन्य. निद्रिस्त माणसाला जागृत करणे म्हणजेच त्याच्या मध्ये उत्साह येणे अत्यंत आवश्यक आहे.

    यासाठी स्वामी विवेकानंदांनी सुद्धा तरुण वर्गाला उद्दिष्ट जागृत भव असे म्हटले.
    ब्रिटिशांच्या विरोधात तरुण वर्ग जागृत होण्यासाठी स्वामींनी हे विधान केले होते.
    आपण जे सात आठ मुद्दे दिलेले आहेत ते निश्चितच महत्त्वाचे आहेत.🙏 राम कृष्ण हरी🙏

Leave a comment