होम हवन

होम हवन हे प्रपंचात व परमार्थात दिसून येणारे यज्ञ आहेत.

आपणाला एकाद्या गोष्टीची प्राप्ती व्हावी यासाठी आपण यज्ञ (प्रयत्न) करतो त्या प्रयत्नाला होम म्हणतात.

या होमामध्ये अर्पण करण्यासाठी जशी काष्टे-समीधा वापरतात यासारखे षड्रिपु व वासना यांची अहुती द्यावयाची असते.

या गोष्टी फार पुराणापासून आपण पहात आलो आहोत.

प्रपंचात पण आपण वास्तु उभी करतो. ती करीत असताना येणारी अनेक विघ्ने यांचा आपण वास्तुशांती रुपी होमामध्ये विसर्जन करतो.अवहेलना झाली असेल तर त्या सर्व गोष्टी आपण या अग्नीकुंडात जाळून टाकतो. हे खरे वास्तुशांतीचे होम हवन म्हणतात.

माणसाचे मनांत असणारा कलह-कवरा मनांतून काढून या अग्निकुंडात टाकणे याला होम हवन म्हणतात.

दशहरा सण मोठा. या दिवशी आपण आपल्या मनातील षड्रिपुवर विजय मिळविण्याची प्रतिज्ञा करतो व मनांतून या सर्व रिपु पासून परावृत्त होतो व अरिहंत होतो.

याप्रमाणे प्रत्येक साधकाने या अग्नीकुंडामध्ये षड्रिपूंचे हवन करावे व आपले घर शांती नगर बनवावे.

प्रापंचिकाने विवेक जागृत करुन मनांत असलेले षड्रिपु यांचा कचरा एकत्र करुन मनाच्या अग्नीकुंडात जाळावा.

त्यासाठी सूर्य देवतेची उपासना करुन त्याच्या तेजामुळे षड्रिपु जळून जातील. नंतर अलगत हाताने मधून मधून त्यावर जल स्पर्श करावा. अशा प्रकारे केलेल्या होमामुळे षड्रिपु अंत:करणातून अलगद बाहेर पडतील व ते उन्मार्गी होतील येथे होमाची प्रचिती येईल.

अशी ही होम हवनाची प्रचिती प्रत्येकाने घ्यावी.

Leave a comment