गृहस्थीतुन संन्यासी प्रवासी

जीवनांत अनेक प्रवास वर्णने आपण पहातो, एकतो, करतो.

गृहस्थीतुन सन्यासी हे असेच एक प्रवास वर्णन आहे. यामध्ये गृहस्थी म्हणजे जो घरामध्ये, प्रपंचात स्थिर रममाण आहे असा. व संन्यासी म्हणजे ज्याला संताच्या सानिध्यात रहाण्याची आस लागली आहे असा.

हा एक अवघड प्रवास आहे. यामध्ये प्रत्येकजण हा गृहस्थाश्रमात जात असतो. त्याला प्रपंच करावाच लागतो. तो प्रपंचात गुरफटत जात असतो. बायको, मुले, वेळ, नातेवाईक यांच्या मोहात तो गृहस्थाश्रमात गुंग असतो. तेथील सुखामध्ये त्याला इतर गोष्टींची आठवण रहात नाही.

अशा या गृहस्थ जीवनाच्या अतिउच्च पदी असताना माणसाची विवेक बुद्धी जागृत होण्याची गरज असते. त्या माणसाने रोज चिंतन मनन करणे गरजेचे आहे.

यातून त्याला गृहस्थ आश्रमातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावयाचा असतो. मार्ग फार कठीण असतो. पण या मार्गाने गेल्याने त्याला आनंद, सुख, समाधान लागणार असते. असे त्याचे चिंतन सांगत असते.

तेव्हा तो गृहस्थी आपली दिनचर्या, विचार, प्रपंचातील सलगी, प्रपंचातील लोकांबद्दल असणारे राग, लोभ, मोह, अहंकार याकडे निरिच्छ भावाने बघु लागतो. तेथे त्याला संन्यास आश्रमाचे तिकीट मिळते व तेथून त्याचा प्रवास संन्यास आश्रमाकडे सुरु होतो.

प्रवास हा खडतर असतो. पण जिद्द श्रद्धा, विश्‍वास याचे जोरावर तो अहोरात्र या प्रवासाचा मार्ग अक्रमत असतो. येणार्‍या अडचणीची तमा बाळगत नाही. त्याच्या मनांत या प्रवासावर भक्ती उत्पन्न होते व न कंटाळता तो आपला प्रवास चालू ठेवतो.

या प्रवासात त्याला अनेक साधक भेटतात. त्यांचे सहवासात त्याला अनेक जवळचे मार्ग पण सापडतात व संतांचा समागम पण घडतो. असा हा गृहस्थी प्रपंचातील लोकांचा विसर पाडत पाडत प्रपंचातून मुक्त होऊन संन्यास आश्रमाचा मार्ग धरतो.

येथे सुद्धा ठिकठिकाणी त्याला या मार्गातून परावृत्त करणारी माणसे भेटतात. पण दृढ निश्‍चयाचे जोरावर तो ठामपणे सन्यासाची गुहा शोधतो. त्या गुहेत गेल्यावर त्याला जे ज्ञान प्राप्त होते ते अवर्णनीय असते. त्याला तेथे कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभते.

त्या सन्यासाश्रमात प्रवेश करताच त्याला स्वर्गसुख काय असते याची प्रचिती येते. सर्वत्र आनंद, सर्वत्र प्रेम, सर्वांना आनंदाने जगण्याची मोकळीक या सर्व गोष्टी तेथे दिसतात. असा हा गृहस्थी त्या क्षेत्रात जावून संन्यासी होतो.

त्याला हजारो, लाखो श्रावक, श्राविका वंदन करतात. त्याचे पूजन करतात.
हा प्रवास जीवनाची इतिश्री आहे हे लक्षात घेऊन या प्रवासाचे तिकीट गृहस्थीने बुक करावे, ही प्रार्थना..

1 Comment

  • सौ. शीला केतकर
    Posted September 25, 2022 3:56 pm 0Likes

    गृहस्थी मधून संन्यासी आश्रमामध्ये प्रवेश करणे अत्यंत कठीण आहे. याला अनेक विरोधकही असतात पण त्यांना लक्ष न देता षड्रिपुं वर विजय मिळवून सत्संग विवेकाने हा मार्ग स्वीकारणे इतके सोपे नव्हे.
    हे तिकीट मिळवणे पण सोपे नव्हे पण हजारो मध्ये एखादा असा होऊ शकतो आणि तो जगाला वंदनीय होतो
    🙏 राम कृष्ण हरी🙏

Leave a comment