गंभीर बनुन जगू नका

हसत खेळत जगा..

कित्येक जण जन्माला आले व गेले. कुणाचे कुणावाचून काही थांबले नाही. मग जीवन जगत असताना एवढे गंभीर का व्हायचे, हसतं खेळतं जगा.

आपलं आपलं म्हणत बसू नका, कारण या जगात आपलं असं काहीच नाही. आपण येतो ते पण काही न घेता येतो व जाताना सुद्धा आपणास काही घेवून जाता येत नाही. मग या पसार्‍याची कशाला काळजी करायची.

जे आहे त्याचा उपभोग घ्या, पण त्याची लालसा ठेवू नका, मोह करु नका.

हरवले, सापडले याचे दु:ख, सुख करीत बसू नका. श्रीमंतीचा गर्व करु नका, गरीबीमुळे हताश होऊ नका. सर्वांशी प्रेमाने वागा.

काळ बदलत आहे, तेव्हा आपली गरज काय आहे, याचा विचार करुन विचारले तरच सल्ला द्या. उगीच गंभीर बनुन आपला पूर्व इतिहास सांगत बसु नका.

क्षुल्लक गोष्टीने मन विचलीत होवू देऊ नका. मोकळेपणाने संथ जीवन जगा. इतरांचा आनंदी करण्याचा प्रयत्न करा.

सर्व जगाचे हीत करणारा मीच आहे, असे समजू नका. अहंकार वाढु देवू नका. कुणाचाही द्वेष करु नका, सुडबुद्धीने वागु नका.

आपल्या आवती भोवतीचे जग पहा, किती गंम्मत आहे चोहीकडे, मुंग्यांची रांग बघा, पाखरांचे थवे बघा, बघा कावळ्यांची स्वच्छता खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे. त्याच्या उसळणार्‍या लाटा तुम्हाला खुणवत आहेत, जा उंच डोंगरावर, किती प्रेमाने तो डोंगर खांद्यावर खेळवतो.

विचारा त्या कोकीळेला, इतकी सुंदर कशी गातेस?

विविध रंगाची फुले  बघा, आयुष्यात विविध रंग भरा, एक सारखे जीवन जगु नका, गंभीर होऊनी जगू नका.

नवी ठिकाणे नवी माणसे यांचेशी मैत्री करा, प्राण्यांशी संपर्क ठेवा, अधिक आनंदी जगा.

आनंदी जगण्यासाठी गंभीर होऊनी जगू नका..

ट्रकच्या मागे लिहिता लिहिता आता माणसाचे मागे लिहिण्याची वेळ आली आहे – सुरक्षित अंतर ठेवा

Leave a comment