दिवाळी निमित्त नात्याचा फराळ

फराळ याचा अर्थ निरनिराळ्या पदार्थांचे भरलेले जेवणाचे ताट. हे झाले पाकशास्त्र.

प्रपंचात असे निरनिराळे नाते स्नेही सोबती असतात तो दिवाळी निमित्त एकत्र येतात व दिवाळीची मौज लुटतात. याला नात्यातला फराळ म्हणतात.

तेव्हा यांची मैफिल कशी चालते त्याचे वर्णन म्हणजे नात्याचा फराळ होय.

बहिणीचे नाते चकली सारखे असते खमंग वरुन काटे पण आंत मायेचा श्रीरंगा.

भावाचे नाते श्रीखंडासारखे असते – आंबट-गोड, तर मैत्रिणीचे नाते जिलेबी सारखे मधुर.

मामा, मामीचे नाते अनारशा सारखे अलवार, नातवंडे खसखशीसारखी चिकटतात हळूवार.

आते, मामे, मावस, चुलत ही बहीणावळ जणु शंकर पाळ्या, येता जाता तोंडात टाकाव्यात.

काका काकू म्हणजे कुरकुरीत शेव-चिवडा, धाक असा की आवडले तरी एकच निवडा.

आत्या आणि मावशीचे नाते करंजी सारखे खुसखुशीत जरा कौतुक केले की, स्वारी येते खुशीत.

वडील म्हणजे चिरोट्या सारखे, पाकात टाका किंवा पिठीसाखरे पेरा प्रेमाचे पदर सुटणारच.

आई म्हणजे बुंदीचा लाडू ,जश्या बुंदीच्या कळ्या तशा ममतेच्या पाकळ्या.

Leave a comment