दिपावली हा हिन्दु धर्मातील एक आनेदोत्सव समजला जातो.
या उत्सवात गणेशाचे तसेच लक्ष्मीचे पूजन केले जाते. गणेश हे आद्य दैवत मानले आहे. लक्ष्मी ही त्याची माता.
याप्रमाणे लक्ष्मी व गणेश पुजनानी दिपावली सण साजरा केला जातो.
गणेश हा विद्येचे दैवत आहे. व्यवहारात विद्येविण सर्व व्यर्थ आहे.
म्हणून या दैवताची प्रथम पूजा केली जाते. गणेशाच्या सर्व परीवाराचेच पूजन या सणामध्ये केले जाते.
गणेशजींच्या दोन पत्नी ऋद्धी-सिद्धी, यांचे जीवनात आगमन व्हावे यासाठी त्यांना या सणासाठी आमंत्रित केले जाते व प्रपंचात या गोष्टी आल्यामुळे त्यांचे पूजन केले जाते.
गणेशाची दोन मुले -1) शुभ 2) लाभ
स्वस्तिक हे शुभ शकुन चिन्ह. यामुळे तुष्टी, पुष्टी येवो म्हणून पूजनात स्वस्तीकला महत्व दिले जाते.
जीवनात आरोग्य व समाधान यावे यासाठी सर्व गुरुंचा गुरु अशा या गणनायकाची ची पूजा केली जाते.
त्याचे आगमनामुळे सर्वत्र आनंदी आनंद होतो. म्हणून हे गणेश पूजन महत्वाचे समजले जाते.