दिनचर्या ही मानवाची आचार संहिता आहे.
या आचार संहितेचे महत्त्व ज्या अन्न ग्रहणामुळे प्रकट होते, ती विधी म्हणजे भोजन विधी होय.
तेव्हा ही भोजनविधी व आपली दिनचर्या कशी असावी या बद्दल आपण सतर्क राहू या.
दिवस भर म्हणजे झोपेतून उठल्यापासून रात्री निद्रेत जाण्यापर्यंत जी जी कामे आपण करतो त्या क्रमाला दिनचर्चा क्रम म्हणतात.
येथे दिनचर्या ठरवित असताना मनांचा चिंतनाचा विषय फार महत्त्वाचा असतो. दिनचर्या ही एका दिवसाची नसून अनेक दिवसापर्यंत नियमाने करावयाची कृती असते.
त्यामध्ये आपण विवेकाने त्या गोष्टीची गरज आपणावर झालेले संस्कार व त्यातून निर्माण होणारा आनंद या गोष्टीचा विचार केला जातो.
या दिनचर्येमध्ये प्रामुख्याने समोर येणारा कार्यक्रम म्हणजे,अन्नग्रहण – भोजन.
तेव्हा तो विधी कसा असावा याचे चिंतन आपण करुया.
अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत व त्यासाठी त्याची संपूर्ण दिवस धडपड चालू असते.
आपल्या जीवनाचे गाडीला जे इंधन (भोजन) लागते ते कोणत्या प्रकारचे असावे, कोणत्या गुणांचे असावे याचा विचार आपण करावा.
दिनचर्चेत प्रथम आपण भोजन विधीचा विचार करु.
जीवनाला सुदृढ आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी भोजनविधी फार महत्त्वाचा आहे.
म्हणतात भोजन हे औषध, जशी गरज तसे भोजन हा मंत्र लक्षात घ्यावा. त्याच्या आचरणाने असाध्य रोगावरील प्रश्न सहज सुटले जातील.
सकाळी उठल्यावर प्रात:विधी उरकून आपण नाष्ट्यासाठी जातो. घरामध्ये नाष्ट्यासाठी बरेच पदार्थ, फळे मांडलेली असतात. आपण उगाच समोर मांडली आहेत म्हणून त्यावर ताव मारु नये.
जाठराग्निवर त्या पदार्थांचा ताण पडणार नाही याचे भान ठेवावे. हलके हलके पचण्यास योग्य असे पदार्थ सेवन करुन दिनचर्चेची गाडी सुरु करावी अनावश्यक पदार्थांचा मोह टाळावा.
यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत काम करण्याची उर्जा या विधीतून मिळते.
त्या उर्जेवर साधारण 11 ते 1 या वेळेत जेवण करावे. या मध्यान्ह भोजनानंतर पण आपणास भरपूर काम करावयावचे असते त्यामुळे हे दुपारचे भोजन यथेच्छ करु नये. या भोजनात थोडी भूक राखून जेवण करावे. तेथे पण आवश्यक उर्जा प्राप्त होईल, आळस येणार नाही.
यानंतर आपण येतो तो सायंकाळच्या भोजन विधीकडे. दिवसभराचे श्रमाने आपण थकून गेलेलो असतो. त्यामुळे अर्थातच भोजनाची आसक्ती वाढलेली असते. अशावेळी आपणाकडे आवडीचा मेनु असेल तर राजासारखे रात्रीचे भोजन करावे. त्यामुळे मन व शरीर शांत व समाधानी राहील रात्री निवांत निद्रा मिळेल.
अशा प्रकारे माणसाने गरजेप्रमाणे जेवण घेतले तर त्याची प्रवृत्ती आरोग्य संपन्न व आनंदी राहील.
आजार थोडा असला तर औषधपण जुजबी लागते. जर तो बळावत गेला तर antibiotic घ्यावे लागते व तो वाढत गेला तर सलाईन लावावे लागते.
तेव्हा अन्न आहे म्हणून केव्हाही व कितीही ते सेवन करु नये.
दिनचर्चेत अन्नाला भोजनाला फार महत्त्च आहे हे ध्यानांत घेवून वागावे.