परमेश्वराचे दर्शन ज्या डोळ्यांनी होते. ज्या भावनेतून परमेश्वर साधकाला दिसतो त्या नयनाचे (डोळ्याचे) वर्णन या ओळीत केले आहे.
सर्व संत हेच म्हणतात,
“धन्य धन्य ते लोचन नित्य करती आलोचन.”
ज्या बालकापासून वृद्धां पर्यंत कोणाच्याही डोळ्यासमोर परमेश्वर स्वरुप येईल त्याचे आयुष्य धन्य झाले.
असे दर्शन घडणे फार भाग्याची गोष्ट आहे.
पण हे दर्शन घडविणारे डोळे फार कमी लोकांना लाभतात. या सृष्टीमध्ये पहाण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत.
त्यासाठी पर्यटक सहली आयोजन करीत असतात. तेथे नायगरा सारखा फॉल बघीतल्यावर लोक म्हणतात, धन्य धन्य ते लोचन.
तसे परमार्थात जे लोक जगन्नाथाचे परमेश्वराचे दर्शन घेतात ते धन्य होत.
अशी धन्यता प्राप्त होण्यासाठी आपला दृष्टीकोन बदला यातच आपली धन्यता आहे.