चांगली पत्नी जीवनाला आकार देते

कोणत्याही गोष्टीला वस्तूला आकार देण्यासाठी कोणाची तरी जरुरी असते.

जसे चांगले मडके बनविण्यासाठी त्याला आकार देणारा कुंभार महत्वाचा असतो.

उत्तम नागरीक होण्यासाठी त्याचा गुरु त्याला आकार देतो.

उत्तम राजकारणी होण्यासाठी उत्तम सहकार्याची साथ असावी लागते.

तसे जीवनाला उत्तम आकार देण्यासाठी आपली स्वप्न साकार करण्यासाठी प्रपंचात उत्तम पत्नीची गरज असते.

वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी चांगल्या पत्नीची साथ असणे गरजेचे आहे.

प्रपंचात सर्व सोई उपलब्ध आहेत. आजुबाजूला चांगले नातेवाईक मित्र मंडळी आहेत.

त्यांच्याशी जमवून घेणे अगर असलेल्या सुविधातून आनंद घेणे ही कला ज्या पत्नीला जमते ती जीवनाला आकार देऊ शकते.

पत्नी ही एक कलाकारच असते. पति-पत्नी ही जीवनाच्या गाडीची दोन चाके आहेत. या दोन चाकांनी प्रपंचाचा गाडा पुढे न्यायचा आहे.

दोन चाके जरी अंतर ठेवून चालत असली तरी गाडीत बसलेल्या गाडीवान त्यांना सुत्रबद्ध करुन पुढे नेत असतो.

त्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या कुटूंबातून आलेल्या पती-पत्नीने एकत्र राहून आपल्या प्रवासाची दोरी खंबीर मनाच्या हातात दिली पाहिजे, तरच त्यांचे जीवन आनंदी होईल. मात्र या आनंदी जीवनासाठी उत्तम पत्नीची गरज आहे हे सत्य आहे.

आनंदी जीवन हे नशीबाने होऊ शकत नाही, तर पती-पत्नी यांनी केलेल्या योग्य निर्णयामुळे होऊ शकते. तेव्हा चांगली पत्नी होण्यासाठी कोणत्या कला असणे गरजेचे आहे हे आपण पाहू.

1. पत्नीची वृत्ती स्थिर, गंभिर, आनंदी असावी.

2. भाषा : ती वापरत असलेले शब्द हे महत्वाचे आहेत.

या बोली भाषेतून ती इतरांचे ह्रदयात स्थान प्राप्त करु शकते. कुशल संभाषणी असल्यामुळे नको असलेल्या वृत्तींना दूर करु शकते.

3. कुशल पत्नीकडे अस्ताव्यस्त अपेक्षा असू नयेत. अंथरुन पाहून पाय पसरावेत, तरच प्रपंच आनंदी होईल.

4. जीवनाच्या खाच खळग्याच्या मार्गावरुन जाताना प्रवासात हादरे, टक्केटोणपे बसणारच. हे लक्षात घेऊन तक्रारखोर स्वभाव बदलला पाहिजे.

अशा या आकार देणार्‍या पलीकडे तीच्या समर्पणाकडे कुटूंबीयांनी प्रेमाने पाहिले पाहिजे.

ती कधीही आपली जबाबदारी टाळत नाही.

जीवनात पैशाने आनंद मिळेलच असे म्हणता येत नाही. तर पैशाबरोबर त्याचे नियोजन करणारी कुशल पत्नीही महत्वाची असते.

अशी चांगली पत्नी भूतकाळातील घटना वारंवार खोदून काढत नाही. त्यामुळे नाराज रहात नाही.

पतीच्या चारित्र्यावर कधी संशय घेत नाही. त्याचेवर पाळत कधी ठेवत नाही.

अती हिशेबीपणा तिच्या जवळ नसतो. चांगल्या पत्नीने जीवनाला आकार देत असताना जोडीदाराला, नाते संबंधी यांचेवर अपार प्रेम करावे, सगळ्या विश्‍वाचे भूत प्रेमात दडलेले आहे.

प्रेमात मनाला उभारी देण्याची ताकद आहे. तेव्हा चांगली पत्नीच तुमच्या जीवनाला चांगला आकार देवू शकते हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. ते विसरु नका.

चांगली पत्नीच जगण्याला आकार देऊ शकते.

Leave a comment