बदलणं हा निसर्गाचा नियमच आहे. तेव्हा बदलाप्रमाणे त्याचे स्वरुप पहाणे माणसाचे कर्तव्य आहे. म्हणून हा प्रपंच
आज आपण बदलत चाललेल्या स्त्रीचे स्वरुप पहाणार आहोत.
खरचं किती बदलली आहे स्त्री,
ती व्यक्त होते, ती विचार मांडते.
नावडत्या जोखडांना ठाम नाही म्हणते..
कारण ती खरच बदलतेय!
बदलली ती, पण तीव्र पडसाद उमटले समाज मनावर,
प्रश्न पडला तिलाच, बदलणं हा नियम निसर्गाचा!
ती पण त्याचाच भाग, मग एवढं वादळ का?
तिनं बदलायचचं नाही हे गृहीत का धरलं गेलं?
ती झाली चर्चेचा विषय, पण ती ठाम राहिली,
मानसिक भावनिक बंध, नात्यांचा बहुपेढी गुंता यातून स्वतःला सोडवून घेतलं.
स्वयंप्रेरणेने उत्स्फूर्तपणे पादाक्रांत केली नवनवीन क्षितिजे, घातली आकाशालाही गवसणी,
कारण ती बदलतेय, ती बदलतेय…..
निरंतर चालू राहील हा प्रवास,कारण निसर्ग आहे.
अनादि, अनंत, तीपण तशीच….
हे आहे स्त्रीचे स्वरुप. बदलत्या स्त्रीचे स्वरुप आपण पाहिले.
आता हे स्वरुप कितपत योग्य आहे व ते कसे शालीन व्हावे या विषयी…
विज्ञानात जसजशी प्रगती होत गेली तसतशी माणसात, स्त्रीयांत, पुरुषांत पण बदल होत गेले. स्त्री पुरुषांची पूर्वी पासून कामाची क्षेत्र वेगळी वेगळी होती. त्यामध्ये दोघांना पण काम करुन प्रपंच आनंदी करण्याची हौस होती.
पुरुषांनी समाजातील स्थान सांभाळायचं व स्त्रीने घर, मुलेे, बाळे, यामध्ये कुठे दुजाभाव नव्हता.
पण विज्ञानाला हे मान्य नव्हते. त्याला अनेकांची मदत घ्यावयाची होती. विज्ञानाने स्त्रीच्या कानात समानतेचा, अहं चा मंत्र फुंकला. मी पण घर सांभाळत समाजकारण, नोकरी, व्यवसाय करुन शकते असे स्त्रीला वाटू लागले. त्यात तिला यश पण येत गेले. पण यशापाठोपाठ तिचे प्रपंचाकडेे दुर्लक्ष होत गेले.
इकडे पुरुष जातीला स्त्रीच्या यशामुळे थोडी नकळत नैराश्यभावना उत्पन्न झाली. तो त्यातून व्यसनाधीन होत गेला.
येथे समाजाची घडी विस्कटली. तेथे द्वंद्व उत्पन्न झाले. एकत्र कुटूंब पद्धतीच्या ह्रास होत गेला.
त्यामुळे संस्कार करणारी माणसे दूर निघून गेली. पैसेवाली माणसे सोबत करुन लागली.
येथे गरज दिसू लागली, स्त्रीच्याा मूळ स्वरुपाची बालकावर संस्कार करणार्या मातेची, घराला घरपण देणार्या गृहीणीची, पतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहाणार्या पत्नीची.
मग विचार मनात आला या पूरातन स्त्रीचे स्वरुप व नवयुगातील स्वरुप यांचा योग्य मेळ बसला तर… मी स्वप्नात अधिकच गुुंतत गेलो.
तेथे मला ऐक नवयुक्ती दिसली ती प्रात:काळी लवकर उठून स्वत: चिंतन मनन योगाभ्यास करायची.
दिवसभराचे नियोजन करायची कुटूंबातील सदस्याच्या आवडी निवडी लक्षात घेवून दिवसभराची दिनचर्या आखायची, त्याप्रमाणे तीचे घरातील व समाजातील कार्य व्यवस्थीत सुरु होते. हे पाहिल्यावर मला वाटले हेच खरे संस्कार होत, हाच या नवयुवतीच्या बदलाचा परीणाम आहे.
तिने मनात आणले तर झाली मुठ सव्वालाखाची करुन ती कुटूूंबाला मानाचे स्थान देऊ शकेल व तसा प्रयत्न स्त्रीने करावा व समाजातील जेेष्ठ नागरीकांनी नवयुवतीवर टिका करीत बसण्याऐवजी तिचे गुणगौरव करीत तिला पुढे जाण्याची संधी द्यावी.