पाठ हा एक विधी समजला जातो. सहसा तो लग्नामध्ये दिसतो. दोन जीवामधील अंतर हे ज्या पाठाने एकरुप केले जाते त्या विधीला आंतरपाठ विधी म्हणतात. लग्नामध्ये वधुवर यांच्यातील असलेले अंतर या विधी म्हणून दूर केले जाते. त्यांना एका बंधनात गंठले जाते म्हणून त्या विधीला अंतरपाठ विधी म्हणतात.
हा एक पवित्र संस्कार आहे. सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांचे समक्ष वधु वरांना मंगलाष्टकातून निरनिराळे उपदेश दिले जातात. ते शांतपणाने वधु वरांनी श्रवण करावयाचे असतात. पांच पवित्र नद्यांच्या पाण्याप्रमाणे तुम्ही प्रपंचात काम करा. कोणाशी शत्रुभाव ठेवू नका इतरांचे सुख दु:खात सहभागी व्हा. माता पित्यांची तसेच सासू सासरे यांची काळजी घ्या. त्यांना आधार द्या. अशाप्रकारे उपदेश देवून भटजी शेवटी वधु-वरांना सावध होण्याची सूचना देतात व हे सर्व मान्य असल्याचे प्रतिक म्हणून वर-वधुला व वधु-वराला हार घालतात. त्यावेळी भडजींच्या आज्ञेने सर्व मंडळी आशिर्वादाच्या अक्षदा टाकण्याची विनंती करतात. त्याचवेळी वाजंत्री वाजू लागते व त्या वाजंतीच्या आवाजात पाणी ग्रहण सोहळा पार पाडतो.
वर-वधु यांच्याती दूही नष्ट होवून ते एकमेकांत विलीन होतात. मध्ये असलेले अंतर अंतरपाठाने दूर होते. येथे आनंदी जीवनाची सुरवात होते. याप्रमाणे लग्न सोहळ्या मध्ये पाणी ग्रहण, कन्यादान, अंतरपाठ, बिदाई या गोष्टी येतात. जसे प्रपंचात तसे परमार्थात पण अंतरपाठ विधी असतो. परमार्थात सांगितले आहे परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे. जेथे जेथे मी पाहिन तेथे तेथे तो भरलेला आहे. अशी एकत्वाची भावना ज्यावेळी साधक व परमेश्वर यांचेमध्ये उत्पन्न होते त्यावेळी त्या दोघांमधील अंतर नष्ट होते. साधक-परमेश्वर रुप होवून जावो.
ज्या भावनेने सगुणामध्ये परमेश्वर पाहून त्याची आपण पूजा करीत करीत निर्गुंण परमात्मा पर्यंत आपण जातो त्या प्रक्रीयेला अंतरपाठ ग्रहण विधी म्हणतात. जेष्ठ नागरिकांनी प्रपंचातील अंतरपाठ विधी करुन प्रपंच साधून परमार्थात प्रवेश केला आहे. यापुढे परमेश्वराशी एकरुप होणे आहे त्यावेळी हा अंतरपाठ मनामध्ये बिंबवाने गरजेचे आहे. परमेश्वराशी अद्वैत भाव यातून सिद्ध करावयाचा असतो.
