अन्नदान श्रेष्ठदान

दान म्हणजे देणे.

देण्याचे अनेक प्रकार आहेत. जसे विद्यादान, कन्यादान, भूदान, देहदान, नेत्रदान, योगदान असे दान करत करत शेवटी आत्मदान पण करतो.

मनुष्याच्या मुख्य गरजा तीन आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. यापैकी श्रेष्ठ गरज आहे ती अन्नाची, तेव्हा सर्व दानात श्रेष्ठ दान कोणते तर ते अन्नदान असे म्हटले जाते.

अन्न,वस्त्र,निवारा या तीन महत्त्वाच्या गरजा आहेत व त्या भागविण्यासाठी माणसाची रात्रंदिवस धडपड चालू असते. एक वेळी वस्त्र नसेल किंवा फाटके तुटके असेल तरी ते चालेल निवार्‍सासाठी एकादा अडोसा चालेल पण पोटासाठी अन्नाशिवाय पर्याय नाही. ते अन्न वेळेवर मिळाले तर तो सुखी समाधानी होतो.

अशा वेळी लक्षात येते की कोणते दान श्रेष्ठ दान? भुकेल्याला अन्न देणे त्याची भूक भागविणे त्याला तृप्त करणे हेच खरे श्रेष्ठ दान होय.

भारतीय संस्कृतीमध्ये अन्नदानाचे फार महत्त्व सांगितले आहे. जेवताना सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये मुक्याप्राण्यासाठी एक घास काढून ठेवण्याची पद्धत आहे. हे पण श्रेष्ठ दान आहे.

भोजनाच्या वेळी अतिथी म्हणून कोणी आला तर तो अतिथी देवो भव म्हणून त्याला भोजन देणे हा पण श्रेष्ठ अन्नदानाचा प्रकार सांगितला आहे.

जैन धमामध्ये मोठ मोठ्या तीर्थाचे ठिकाणी देवदर्शना बरोबर अन्नाचा प्रसाद देण्याची सोय केलेली असते. या पाठीमागे अन्नदान हे भगवंतांनी सांगितलेले श्रेष्ठ दान होय. साधक तेथील प्रसादामुळे प्रसन्न होतो त्याचा आत्मा तृप्त होतो.

प्रवासात खिशात पैसे असून त्याला अन्न मिळू शकत नाही. तर या तीर्थाचे ठिकाणी पैशाच्या गोष्टी न करता भोजन मिळते. यात्रेकरु तृप्त होतात.

हे सर्व पाहिल्यावर-अनुभवल्यावर मनांत येते अन्नदान हे श्रेष्ठ दान होय.

निरनिराळ्या ठिकाणी अखंड हे अन्नदान चालू असते. गोंदावले येथे ब्रम्हचैतन्य महाराजांनी हे चालू ठेवले आहे तसेच कुंभोजगिरी येथे चालू आहे.

कोणतीही अपेक्षा न ठेवता भक्तीने केलेले अन्नदान हे श्रेष्ठ दान होय. आपण पण तसा दानाचा प्रयत्न करावा.

Leave a comment