साधु व भोंदु यांचे वर्णन करताना दांभिक (भोंदु) लोक कशा प्रकारे जगात वागत असतात, याची प्रचिति या ओवीत केली आहे.
खोटा आव आणून आपण सज्जन आहोत, असा डांगोरा पिटणारे बहुरुपी समाजात फिरत आहेत. त्यांनी साधुचे, सज्जनाचे रुप घेतले आहे. पण ते दुर्जन आहेत.
ते स्वत:ला परोपकारी म्हणवून घेतात व जगाला लुटतात.
लोकांची फसवणूक करुन कमाई करतात. या लोकांचे नाटक उघड केले पाहिजे. नाही तर समाजाची धुळदाण होवून जाईल.
हे लोक वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी विषयासक्ती शमविण्यासाठी अनेक पापं करीत असतात. पण बाहेरुन आपण कसे साव आहोत हे दर्शवित असतात.
विवेकी माणसांनी या बहुरुपी माणसाचे सोंग ओळखून त्याला त्याचे खरे स्वरुप दाखविले पाहिजे. तरच समाजातील अनाचाराला लगाम बसेल.
ऐसे संत झाले किती, तोंडी तंबाखुची नळी,
स्नान संध्या बुडविती, पुढे भांग ओढा चिलीम ।
असे कित्येक ढोंगी समाजात फिरत आहेत. त्यांचा शोध घेवून त्यांना सन्मार्गावर आणण्याचे काम विवेकाने करावे.