वाणी जयराम

🌹🌼🌹🎶🌅🎶🌹🌼🌹 *🌼 आजची पहाट 🌼* *आधुनिक मीरेला निरोपाची*

🌹🌼🌸🔆🎶🔆🌸🌼🌹 *भारतीय संगीत क्षेत्राने देशभरातील लोकांची हृदये जोडली आहेत. वेल्लोर चेन्नईत जन्मलेल्या एका गायिकेने वयाच्या सहाव्या वर्षीच संगीतातील राग ओळखणे सुरू केले.. आठव्या वर्षी नभोवाणीवर गाणे गात गान प्रवास प्रारंभ केला अन् पुढे चक्क ५० वर्षाहून अधीक काळ आपल्या १० हजारावर गाण्यांनी आणि शेकडो कार्यक्रमातून रसिक मनाला आपल्या सुरांनी आनंदी करणाऱ्या दक्षिण भारतीय गायिका म्हणजे वाणी जयराम.* *चक्क १९ भाषेत त्यांनी गाणी गायलीत. त्यांच्या दक्षिणेकडील तेलगु.. तमीळ.. कन्नड या भाषांतील गाण्यांनी लोकप्रियतेचा विक्रमच केला. दाक्षिणात्य चित्रपटात आवश्यक शास्त्रीय संगीतातील ताना.. हरकत.. आवाजातील चढउतार म्हणजे यामध्ये पारंगत असल्याची पावतीच. मराठीतील मोजक्या गाण्यानीही त्या तेवढ्याच लोकप्रिय आहेत.* *गायन क्षेत्रात प्रगतीसाठी त्या स्टेट बँकेतील नोकरीत हैद्राबादहून मुंबईत बदली घेत आल्या. एका कार्यक्रमात वसंत देसाई यांनी त्यांचा आवाज ऐकून कुमार गंधर्व यांच्या सोबत गाण्याची संधी दिली. "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी.." गात त्यांचे मराठीशी 'ऋणानुबंध' जुळले.* *त्यांनीच हिंदी चित्रपट 'गुड्डी' मध्ये संधी दिली. शास्त्रीय संगीतावर आधारित "बोले रे पपीहरा पपीहरा.." या गाण्यामुळे सिनेमा लागताच एकाच रात्रीत त्यांचे नाव देशभर गाजले. आवाजात विलक्षण गोडवा असलेल्या वाणी जयराम यांची दक्षिणेतील 'लता' म्हणून ओळख निर्माण झाली. मग बहुतेक सर्वच संगीतकारांची हिंदीतही गाणी गायली.* *त्यांचा ओढा हा भक्ती गायनाचाच. पं. रवीशंकर यांनी संगीत दिलेल्या.. हेमामालीनी यांनी मीरेची भूमिका साकारलेल्या 'मीरा' चित्रपटाचे त्यांनी गायलेले अभंग देशभर एवढे लोकप्रिय ठरले की त्यांची आधुनिक काळातील 'मीरा' ही ओळख निर्माण झाली. त्यांचे गझल गायन.. भक्ती गायनाचे कार्यक्रम देशविदेशात गाजलेत.* *तीन वेळा सर्वश्रेष्ठ गायिका राष्ट्रीय पुरस्कार.. चार राज्य पुरस्कार, फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार तसेच विदेशातही काही पुरस्कार प्राप्त झालेत. नुकताच वाणी जयराम यांना भारत सरकारचा 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर झाला. पण "मेरे तो गिरिधर गोपाल.." अशी आर्त साद घालत ही मीरा खरंच आपल्या कृष्णाला भेटायला निघून जाणे हे तमाम रसिकांच्या मनाला चटका लावून गेलेय.* *जीवनातील एवढी वर्षे संगीत सेवेला अर्पण करुन मानवी मन आनंदी करणाऱ्या या गायिकेला श्रद्धासुमने अर्पण करुयात.*

🌹🎶🌸🎶🙏🎶🌸🎶🌹

काय माझा आतां
पाहातोसी अंत
येई बा धांवत देवराया

माझ्या जीवा होय
तुजविण आकांत
येई बा धांवत देवराया

ये रे ये रे देवा
नामा तुज बहात पांडुरंगा

🌹🎶🌸🔆🎶🔆🌸🎶🌹

रचना : संत नामदेव
संगीत : वसंत देसाई
स्वर : वाणी जयराम

🎼🎶🎼🎶🎼 🎧

🌹🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏🌹
०५.०२.२०२३

💐🎶💐🌼🌹🌼💐🎶💐

Leave a comment