आजपर्यंत दोन तीन वेळा दासबोधाचे पारायण केले. सर्व समजावून घेतले. जीवनाचा सर्व अर्थ समासा – समासातून जाणून घेतला.
पण सावधान म्हणताच लग्न मंडपातून निघून गेल्यानंतर आयुष्यभर एकाकी राहून जीवन जगणार्या व समर्थांच्या विचारांची धुरा वाहणार्या त्यांचे पत्नीचे पुढे काय झाले, हे मात्र कोणत्याही ग्रंथात समोर आले नाही. त्यासाठी प्रयत्न झालेले दिसले नाहीत.
तेव्हा दासनवमीच्या निमित्ताने त्या माऊलीचे स्मरण करणे उचीत वाटते. या माऊलीचे शिवरायावर, रयतेवर किती प्रेम होते, हे खुद्द महाराजांनी वेष बदलून महाराजांची टिका करीत असल्याचे भासविले. तेव्हा रागाने त्या माऊलीने तलवार काढून बहुरुप्याचे सोंग घेतलेल्या शिवाजी महाराजावर टेकवली येथे त्या माऊलीचे रयतेवरचे प्रेम व महाराजाबद्दलची निष्ठा दिसून येते.
दुसर्या दिवशी शिवाजी महाराज पूर्ण इतमामात त्या माऊलीला भेटायला आले आणि त्यांना आपला जिरेटोप काढून त्यांनी त्या माऊलीचे प्रतिनिधी म्हणून काम करावयाचे होते. पण त्या माऊलीने तो जिरेटोप परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला येथे त्या माऊलीची अनासक्ती दिसून येते.
त्या माऊलीने राज्याचा मोहाचा त्याग केला व राजांचे कौतुक करुन आपला निरपेक्ष भाव दाखविला.
अशा या माऊलीला आयुष्यात फक्त एकदाच समर्थांचे दर्शन घडले, तेही फक्त पाच मिनिटे.
समर्थ व माऊली कृष्णेच्या समांतर दोन्ही काठावर चालत होते. आपले समाज प्रबोधनाचे कार्य करीत होते. पण एकमेकांना ते कधी समक्ष भेटले नाहीत. मात्र दोघांनी मनांतील कार्य कधी सोडले नाही.
इतर पतिव्रते प्रमाणे या माऊलीने महाराजांना कधी घटस्फोट दिला नाही. किंवा वेगळा प्रपंच थाटला नाही. हेच भारतीय संस्कृतिचे बीज या निमित्त जनतेसमोर सादर करताना धन्यता वाटते.