वादळ

वादळ याचा अर्थ अस्थिरता, गडगडाहट, आकांडतांडव, गोंधळ, गडबड होय.

चालत असताना एकाएकी पाऊल वाकडे पडले, तर अपघात होतो, तेथे लोक जमतात. मारामारी सुरु होते व वातावरणात वादळ निर्माण होते.

यासाठी माणसाने चालताना काळजीपूर्वक पाऊल टाकावे.

तसेच बोलताना सुद्धा शब्द काळजीपूर्वक वापरला नाही तर भांडणे, शिव्याशाप सुरु होतात, तेथेपण वादळी वातावरण तयार होते.

वादळ उत्पन्न होण्याचे आणखी एक कारण म्हणजे हलकी नजर . या हलक्या नजरेने आपण एखाद्याकडे पाहू लागलो तर वादळ माजते.

ऐकण्याबाबत पण तसेच आहे. जो हलक्या कानाचा असतो, तो काळजीपूर्वक एखादी गोष्ट न ऐकल्यामुळे प्रपंचात वादळ निर्माण करु शकतो.

असे वादळ सृष्टीमध्ये पण निर्माण होवू शकते. जेव्हा हवामानात हलक्या दाबाचा थर निर्माण होतो तेथे आकाशात ढग बघ्याची भूमिका घेऊन जमतात व गोंधळ, गडगडाट करतात, तेथे वादळ उत्पन्न होते. तेथे मोठे नुकसान होवू शकते, वित्त हानी होते.

परमार्थामध्ये पण अशी वादळे निर्माण होतात. साधकाला जेव्हा आपल्या तपश्‍चर्येची घमेंड चढते, तो इतरांना कमी लेखू लागतो.

तेथे त्याचा गर्व कमी करण्यासाठी कोरोना सारखे आजार समोर येतात व सर्व जगात वादळ निर्माण होते.

हा ईश्‍वरी कोप असतो. तो थांबविणे माणसाचे हाताबाहेर जाते.

तो कोप शमेपर्यंत साधकाने घरातच बसावे व स्वत:चे रक्षण करावे असे सांगितले जाते.

वादळ निर्माण होवू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, प्रपंचात हलक्या प्रवृत्तीशी संपर्क ठेवू नये. वागणूक विचारपूर्वक ठेवावी.

उत्तम चिंतन असावे, चांगल्य साधूसंतांची संगत, असरा आपण घ्यावा.

प्रपंचात काम, क्रोध, मोह , मत्सर, माया, आसक्ती यांच्या प्रभुत्वाने वादळे निर्माण होतात. त्यामुळे प्रापंचिकाचे डोळ्याला पाणी येतेे. तो रडकुंडीला येतो.

त्यासाठी त्याने या षडरिपूवर ताबा मिळवावा. वादळ हा परमेश्‍वराचा खेळ आहे.

वादळ शमविणे अगर उग्र करणे त्याचे हाती आहे. तेव्हा परमेश्‍वराला शरण जावून प्रपंचातील व परमार्थातील वादळ शमविण्याचा प्रयत्न साधकाने करावा.

Leave a comment