गीता जयंती ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल एकादशी च्या दिवशी साजरी केली जाते. असे मानले जाते की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीतेचे कथन केले.
श्रीकृष्णाने रणभूमीवर अर्जुनाला जो संदेश दिला, जे मार्गदर्शन केले तेच मार्गदर्शन पुढे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून वारकर्यांना केले.
तेव्हा हा गीतेचा संदेश फार मोलाचा आहे.
या संदेशात श्रीकृष्ण साधकास सांगतात. या जगांत सर्वांत मोठी संपत्ती बुद्धी होय.
जीवन कलहामध्ये जगण्यासाठी उत्तम हत्यार कोणते? तर धैर्य.
सर्वात चांगली सुरक्षा कोणती? तर विश्वास.
तो कधी गमावू देवू नका. सर्वांत चांगले औषध म्हणजे हसू ते कधी रुसू देवू नका. सतत हसतमुख रहा.
या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला एक पैसा पण खर्च येणार नाही. त्या गोष्टी मोफत आहेत. त्यांची कदर करा. नेहमी नविन नविन कल्पना साकारण्याचा प्रयत्न करा.
अपयशाची खंत बाळगू नका, ठाम निर्णय घ्या, अचूक वार करा, शत्रुला पराजीत करा. सर्वांत महत्वाचे म्हणजे ‘मला शरण या’ मी तुमचे रक्षण करण्यासाठी उभा आहे.
कोण सोडून गेले याचा विचार न करता कोण बरोबर आहेत त्यांचा विचार करा.
याप्रमाणे जीवनात कसे जगायचे याचे उत्तम मार्गदर्शन गीता संदेश यातून दिले आहे.
तुमच्या इच्छा शक्तीच्या माध्यमातून स्वत:ला चांगले वळण द्या, कधीही स्वेच्छेने स्वत:ला उध्वस्त करु नका, हिच इच्छाशक्ती तुमचा मित्र किंवा शत्रू होऊ शकते – श्रीमद्भगवद्गीता
हे मार्गदर्शन आपल्या जीवनाला सुसंस्कृत करेल. त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न साधकाने करावा हीच या संदेशाची अपेक्षा.
श्रीमद्भगवद्गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
#श्रीमद्भगवद्गीता #गीताजयंती