साई इतना दिजीये, जामे कुटुंब समाये । मैं भी भूका न रहू, साधू ना भूका जाय ।

प्रापंचिका प्रमाणे साधु संत परमेश्वराकडे काय मागतात याचे विश्लेषण कबीराच्या या शब्दात केले आहे.

ते म्हणतात – देवा मला येवढेच दे ज्यामध्ये मी व माझे कुटुंब भुके रहाणार नाही व दारात आलेला अतिथी उपाशी जाणार नाही आणि हीच ती भारतीय संस्कृती सांगते.

‘‘अतिथी देवो भव’’ केवढे तत्वज्ञान या दोन ओळीमध्ये भरले आहे.

जैन तत्वज्ञाना प्रमाणे हीच खरी साधर्मिक भक्ती होय. प्रपंचासाठी प्रपंचापुरते मला दे व माझ्या दारात आलेला अतिथी उपाशी राहू नये.

हाच खरा परमार्थ होय. ज्या घरात उत्तम अतिथी संस्कार होतो त्या घरातील पाणी म्हणजे अमृत होय. त्या घरातील माती माथेवर लावणे म्हणजे चंदनाचा गंध कपाळावर लावणे होय.

प्रेम, श्रद्धा आणि आनंद या भावनेतून दिला गेलेला आहार यातून खरा भाग्योदय होतो.

जो देतो तो देव होतो जो राखून ठेवतो तो राक्षस होतो. तेव्हा मूक प्राणी, चिमण्या, कबुतर, माकडं, गाय व इतर मुक प्राण्यांना यांना चारा दिल्याने परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होणार नाही कां?

म्हणून जीवदया करा, सर्व जण सुखी होवोत यातच मी सुखी होईन.

Leave a comment