निवृत्तीचे दुसरं दालन

निवृत्तीचे नाटक प्रवेश दुसरा –

सकाळच्या पहिल्या चहाची जबाबदारी माझ्यावर आली,

दूध उतु जावू नये याची काळजी, माझ्या शिरी आली,

निवृत्ती आजचा नाष्टा ठरवायची आणि करायची पाळी माझ्यावर आली.

कांदा चिरताना आसवे गाळण्याची वेळ आता माझ्यावर आली.

निवृत्तीमुळे दुसरं दालन मी उघडले, कुकरच्या शिट्ट्या मोजण्याची आता सवय मला झाली.

तव्यावरच्या गरम पोळ्या आता चटके देईनाशा झाल्या, निवृत्त मी झालो, निवांत ती झाली.

दुधाचा खाडा, पेपरचा राडा, फोन बिल, लाईट बिल हिशेब ठेवताना माझी त्रेधातिरपीट झाली.

निवृत्तीमुळे निवांत ती झाली, घड्याळाच्या काट्या सोबत फिरण्यातून ती मुक्त झाली,

लवकर उठण्याची सवय आता तिने सोडून दिली.

निवृत्ती माझ्यासाठी, धावणारी ती जरा थकु लागली. निवृत्त मी झालो निवांत ती झाली.

निवृत्तीच्या दुसर्‍या दालनात उभा मी राहिलो.

Leave a comment