दानशूर अशा परमात्म्याचे हे रुप या ठिकाणी दाखविले आहे.
आपण प्रपंची माणसे सतत कांही ना काही फळाची अपेक्षा ईश्वराकडून करत असतो व तो ती अपेक्षा पूर्ण करतो अशावेळी मनांत विचार येतो कोण बरे हा इच्छित फळ देणारा आहे ?
विचारांती लक्षात येते की हे काम करणारा परमेश्वर आहे. पण तो आपले स्वरुप दाखवित नाही. तो कार्य करुन अलिप्त रहातो. कोणतीही अपेक्षा ठेवत नाही मात्र साधकाला शांतता समाधान देतो.
अलीबाबा चाळीस चोर याप्रमाणे एखाद्या गोष्टीची आपण मागणी करावी त्याक्षणी ती गोष्ट घेवून जो समोर येतो त्याला फळ दातार म्हणतात.
प्रपंचात अनेक वेळा आपल्या अपेक्षा पूर्ति तो करत असतो पण आपण प्रपंची लोक त्याचा शोध घेत नाही. त्याचे स्मरण करीत नाही. फळ मिळाले काम झाले. आपण त्याला विसरुन जातो.
तो कल्पतरु ईश्वर आहे. प्राणीमात्राच्या (माणसाच्या) अंगुष्ठा मध्ये हा अमृतघट बसविलेला आहे, वास करीत असतो. त्या घरामध्ये सर्व रिद्धी- सिद्धी साठविल्या आहेत. त्याच्या साह्याने दुसर्याला चांगला शकुन-नाम ओढावयाचा असतो व तो शकुनाचा घट त्याला सुपूर्त करावयाचा असतो.
मंगल प्रसंगी आपण त्या व्यक्तीला नाम ओढून त्याचे औक्षण करतो व त्याला बिदागी देतो. ही बिदागी म्हणजे वांछीत फळ होय. आशिर्वाद होय या वांछीत फळ देणार्या ईश्वराला आपलेसे केले की आपण जे देतो त्याचे दसपट आपणाकडे परत येते. तेव्हा आपण फळाची अपेक्षा न करता ज्याला गरज आहे त्याला देत गेले पाहिजे.
अशा या देण्या घेण्याच्या व्यवहारातून ऋद्धी, सिद्धीचे भांडार भरत जाते. परमार्थ पूजेमध्ये पण हा अंगठा आपण पूजा करते वेळी परमेश्वराला अर्पण करतो त्याला अंगठ्याने नाम ओढतो.
परमेश्वर न मागता आपणाला त्याचे चांगले फळ देतो. म्हणूनच म्हंटले आहे.
अंगुष्ठे अमृत वसे, लब्धितना भंडार,
श्री गुरु गौतम समरिये मन वांछीत फल दातार.
असा हा मन वांछीत फळ दातार. महिमा आहे याचे सतत स्मरण ठेवावे.