प्रवास

प्रगतीच्या दिशेने वाटचाल ध्येय पूर्तीसाठी त्याचा प्रवास जन्माला येतो त्यावेळे पासून त्याचा प्रवास सुरु होतो. हा प्रवास अखंड चालू असतो. प्रवास म्हंटले की दगदग आली घाई गडबड आली. उन्हातानात रखडणं आलं अनेक अडचणी समोर येतात. या सर्व अडचणीला सामोरे जात त्याची प्रगती ए्नसप्रेस जोमात सुरु होतो. प्रवासात विघ्ने ही येणारच सोईस्कर आसन. वातानुकारीत डबा त्यासाठी लागणारे ठशीर्शीींरींळेप उेपषळीाशव ढळलज्ञशीं या सर्व गोष्टी आल्या जो खरा विवेकी प्रवासी असतो तो या सर्व गोष्टींचे भान ठेवून आपली प्रवासाची तयारी करतो. कुठे जायचे हे नक्की करतो. त्या गाडीचे वेळापत्रक डोळ्यासमोर ठेवून सर्व सामाना सहित प्रवासाची सुरवात करतो. अशा विवेकी माणसाचा प्रवास सुखाचा होतो त्याला समाधान लाभते. जीवनाचा प्रवासपण अशा धक्का धकेतून सुरु होतो एक एक प्रसंग पार करीत त्याची गाडी ठरलेल्या थांब्यावर येऊन उभी रहाते तेथे माणसाला जागृती असण्याची गरज असते. गाडी पुढे जातच आहे म्हणून इच्छीत थांबा आला तरी गाडी सोडायची नाही हा विचार त्याच्या प्रवासाचा घात करतो. आपले स्टेशन कोणते व ते आल्यावर गाडीचा मोह सोडून खाली उतरायचे हे जो जाणतो तो खरा प्रवासी होय. जीवन प्रवासात खूप अडथळे येतात. निसर्गात पण आपण पहातो नदी उंच शिखरावर उगम पावते तेथून ती खाली खाली प्रवास करीत डोंगर कपार्‍या पार करीत मार्गातील अडचणी पार करीत सपाट भू भागावर अवतरते. या प्रवासात तिला अनेक नद्या-नाले मिळतात. या प्रवासात कुणाला ही न दुखविता ती पुढे जात जात समुद्राला मिळते व प्रवास पूर्ण करते या प्रवासात त्या नदीचे रुप सौंदर्य असे वाढलेले असते की माणूस ते पहातच रहातो. मोठ्या जलशयावर अनेक प्रकल्प उभे केले जातात. वीज निर्मिती होते व सर्वत्र लखलखाट होतो.
मग माणसाचा जीवन प्रवास अशी समृद्धी, श्रीमंती, सौख्य कां निर्माण करणार नाही. इच्छा तेथे मार्ग या न्यायाने चिंतनाने आपल्या प्रवासाचे चित्र उभे करा. प्रयत्नाची पराकाष्टा करा जर नित्यनियमाने चिंतन मनन केले तर जीवनाचा प्रवास आनंद दायक होईल. त्याला आखलेल्या थांब्यापर्यंत कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी हवे नियोजन जीवन विद्या हेच सांगते. ज्याने पूर्ण जीवनाचा योग्यवेळी विचार केला त्याप्रमाणे नियोजन केले व मार्गानुक्रमण कले तर त्याचा जीवन प्रवास सुखा समाधानाचा शांतीचा होईल. तसा प्रयत्न प्रत्येकाने करावा ही इच्छा.

Leave a comment